राष्ट्रपती कार्यालय
गणेश चतुर्थी निमित्त राष्ट्रपतींच्या शुभेच्छा
Posted On:
01 SEP 2019 7:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2019
भारताचे राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद यांनी गणेश चतुर्थी निमित्तच्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, "गणेश चतुर्थीच्या पवित्र प्रसंगी मी देशातील आणि परदेशातील सर्व नागरिकांप्रति सदिच्छा व्यक्त करतो.
गणरायाच्या जन्मानिमित्त गणेश चतुर्थी हा सण साजरा केला जातो. गणपती हे विद्या, ज्ञान आणि समृद्धी अशा जीवनमूल्यांचे प्रतीक आहे. राष्ट्रीय विकास आणि समाजातील सर्व वर्गांचे कल्याण साध्य करण्यासाठी आपण ही जीवनमूल्ये आत्मसात केली पाहिजेत. आपण सर्व मिळून हा सण पारंपारिक उत्साहात आणि आनंदात साजरा करू या."
D.Wankhade/M.Pange/D.Rane
(Release ID: 1583804)
Visitor Counter : 156