राष्ट्रपती कार्यालय

वृत्त निवेदन

प्रविष्टि तिथि: 01 SEP 2019 4:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2019

 

माननीय राष्ट्रपती यांनी केलेल्या नवीन नियुक्ती आणि काही बदलांची माहिती पुढीलप्रमाणे आहे -

  1. हिमाचल प्रदेशचे राज्यपाल कलराज मिश्रा यांची बदली करण्यात आली असून त्यांची राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  2. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून भगतसिंह कोश्यारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  3. बंडारू दत्तात्रेय यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  4. अरिफ मोहम्मद खान यांची केरळचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  5. डॉ. तामिळीसाई सौंदराराजन यांची तेलंगणाचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

उपरोक्त नियुक्ती संबंधित मान्यवर त्या पदाचा आणि कार्यालयाचा कार्यभार स्वीकारतील, त्या तारखेपासून ग्राह्य धरण्यात येणार आहेत.

 

 

D.Wankhede/S.Bedekar/D.Rane

(रिलीज़ आईडी: 1583782) आगंतुक पटल : 149
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English