आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

आरोग्य मंत्रालयाच्या क्षयरोग विभागाचा वाधवानी इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्ससोबत करार

Posted On: 30 AUG 2019 6:58PM by PIB Mumbai

क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वाव शोधण्याकरिता आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय क्षयरोग विभागाने वाधवानी इन्स्टिट्यूट फॉर आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या संस्थेसोबत करार केला आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाद्वारे आरोग्य क्षेत्रात अचूकता, स्रोतांची बचत आणि गुणवत्तापूर्ण सेवा पुरवणे शक्य होऊ शकते. जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टांतंर्गत ठेवण्यात आलेल्या लक्ष्यपूर्तीच्या पाच वर्ष आधीच म्हणजे वर्ष २०२५ पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचे भारताने ठरवले आहे.

***

RT/SK


(Release ID: 1583691) Visitor Counter : 126


Read this release in: English