रेल्वे मंत्रालय

रेल्वे क्षेत्रातील व्यवसायांच्या संधीबाबत माहिती देण्यासाठी लखनौ इथे 30 ऑगस्ट रोजी विक्रेता महामेळावा 2019 चे आयोजन

Posted On: 28 AUG 2019 4:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2019

 

भारतीय रेल्वेच्या संशोधन आरेखन आणि मानक संघटनेने (आरडीएसओ) 30 ऑगस्ट 2019 रोजी लखनौ इथे विशेष, विक्रेता महामेळावा 2019 आयोजित केला आहे. रेल्वे क्षेत्रातील व्यवसायांच्या संधीबाबत माहिती देण्यासाठी आरडीएसओमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आला असून, यासाठी देशभरातल्या उद्योजकांना आमंत्रित करण्यात आले आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. अधिक सहभाग वाढविण्यासाठी एफआयसीसीआय, सीआयआय, ॲसोचॅम, आयईईएमए या संस्थांना कळविण्यात आले आहे.

 

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane

 



(Release ID: 1583256) Visitor Counter : 104


Read this release in: English