संरक्षण मंत्रालय

आयएनएस तरकश सेनेगलमधल्या डकार इथे दाखल

Posted On: 28 AUG 2019 4:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2019

 

भारतीय नौदलाची आयएनएस तरकश सेनेगलमधल्या डकार इथे दाखल झाली आहे. भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडच्या ताफ्यातली ही नौका असून, ती सेनेगलच्या तीन दिवसांच्या भेटीवर आहे. नौकेची धुरा कॅप्टन सतीश वासुदेव यांच्याकडे असून, आधुनिक शस्त्रे आणि सेन्सर्सनी ती सज्ज आहे.

डकार इथल्या भेटीदरम्यान सेनेगलमधले विविध शासकीय अधिकारी आणि मान्यवर नौकेला भेट देणार आहे. सेनेगलच्या नौदलासोबतही चर्चा होणार आहे.

 

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane

 


(Release ID: 1583255)
Read this release in: English