गृह मंत्रालय
पोलिसांनी काळानुसार चालणे आणि पारंपरिक दृष्टिकोनाला छेद देण्याची गरज
बीपीआरडीच्या 49 व्या स्थापना दिवसाचे अमित शहा यांनी भूषविले अध्यक्ष स्थान
Posted On:
28 AUG 2019 4:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2019
केंद्रीय गृह व्यवहार मंत्री अमित शहा यांनी आज पोलिस संशोधन आणि विकास कार्यालयाच्या 49व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. यावेळी राज्यमंत्री जी. किशन रेड्डी प्रमुख पाहुणे होते. गृहमंत्री शहा यांनी सेवेमध्ये उत्तीर्ण झालेल्या तसेच संशोधन विकास आणि पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी परिणामकारक योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. शहा यांनी 50 वर्षांच्या कारर्कीदीत बीपीआरडीने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल आणि पोलिस सुधारणा आणि प्रशिक्षणाबद्दल गौरवोद्गार काढले.
पोलिसांना मार्गदर्शन करतांना शहा म्हणाले की, संस्थात्मक परिणामकारक पद्धती आणि उत्कृष्ठ पोलिस हे इतरांसमोर आदर्श असतात. कॉन्स्टेबलपासून डीजीपीपर्यंत प्रत्येकाने स्वत:ची भूमिका स्पष्ट ठेवणे गरजेचे आहे.
B.Gokhale/D.Rane
(Release ID: 1583254)
Visitor Counter : 132