माहिती आणि प्रसारण मंत्रालय
माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांच्या हस्ते 7व्या कम्युनिटी रेडिओ संमेलनाचे उद्घाटन
प्रत्येक आकांक्षित जिल्ह्यात किमान एक कम्युनिटी रेडिओ केंद्र उभारण्याला सरकारचे प्राधान्य : अमित खरे
Posted On:
27 AUG 2019 6:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2019
नवी दिल्ली इथल्या डॉ. बी.आर. आंबेडकर भवन इथे आज माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांच्या हस्ते 7व्या कम्युनिटी रेडिओ संमेलनाचे उद्घाटन झाले. देशभरातल्या कम्युनिटी रेडिओ केंद्रांचे प्रतिनिधी आणि माहिती व प्रसारण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. एका पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन यावेळी खरे यांच्या हस्ते झाले.
खरे यांनी आपल्या भाषणात कम्युनिटी रेडिओ केंद्रांचे कौतुक केले. कम्युनिटी रेडिओचे महत्व, आपत्तीच्या काळात माहितीच्या प्रसारात त्यांची भूमिका त्यांनी अधोरेखित केली. कम्युनिटी रेडिओमुळे ग्रामीण भागात बदल दिसून येत असल्याचे ते म्हणाले.
कम्युनिटी रेडिओ स्थानिक गरजांचा विचार करतात. स्थानिक भाषा वापरतात. प्रत्येक जिल्ह्यात एक तरी कम्युनिटी रेडिओ केंद्र असले पाहिजे. प्रत्येक आकांक्षित जिल्ह्यात किमान एक कम्युनिटी रेडिओ केंद्र उभारण्याला सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारच्या योजना, उपक्रम विशेषत: लोकांच्या जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या योजना जनतेतपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन खरे यांनी उपस्थितांना केले.
कम्युनिटी रेडिओ केंद्र उभारण्याच्या प्रक्रियेवरच्या लघुपटाचे अनावरण खरे यांच्या हस्ते झाले.
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
(Release ID: 1583176)
Visitor Counter : 138