कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
भारताची युवाशक्ती इतर देशांच्या अर्थव्यवस्था मजबूत करण्यात योगदान देऊ शकते – डॉ. महेंद्रनाथ पांडे यांचे जागतिक कौशल्य स्पर्धा 2019 मध्ये प्रतिपादन
प्रविष्टि तिथि:
27 AUG 2019 5:09PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 ऑगस्ट 2019
भारताची युवाशक्ती इतर देशांच्या अर्थव्यवस्था मजबूत करण्यात योगदान देऊ शकते, असे प्रतिपादन कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांनी केले आहे. रशियातल्या कझान इथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धेत मंत्र्यांच्या परिषदेला ते संबोधित करत होते. 40 देशांचे प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित होते.
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लोकसंख्या शास्त्रीय लाभांश क्षमतेचा वापर करुन घेण्यासाठी भारत सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे पांडे यांनी सांगितले. लोकसंख्या शास्त्रीय लाभांशानुसार सरासरी 27.6 वर्ष वय असलेला भारत तरुण देश आहे. 2022 ते 2034 या काळात सर्वात मोठे कार्यदल भारताकडे असेल.
स्पर्धात्मक कौशल्य या कार्यदलाकडे असावीत यासाठी त्यांना कुशल करण्याकरिता जागतिक दर्जाचा अवलंब केला असल्याचे पांडे यांनी सांगितले.
B.Gokhale/S.Kakade/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1583159)
आगंतुक पटल : 111
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English