जलशक्ती मंत्रालय

जलशक्ती मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जलजीवन अभियाना संदर्भात राज्यांच्या मंत्र्यांची परिषद

प्रविष्टि तिथि: 27 AUG 2019 2:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2019

 

केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथे जलजीवन अभियानासंदर्भात राज्यांच्या मंत्र्यांची परिषद झाली. 17 राज्यांचे पेयजल मंत्री आणि प्रधान सचिव / सचिव या परिषदेला उपस्थित होते.

ग्रामीण भागातील प्रत्येक घराला वर्ष 2024 पर्यंत नळजोडणी देण्यासाठी जलजीवन अभियानाची घोषणा करण्यात आली आहे. त्याच्या अंमलबजावणीसंदर्भात चर्चा करणे हा या परिषदेचा हेतू होता. ग्रे वॉटरचा पुनर्वापर आणि पुनर्भरणाबाबत राज्यांनी नियोजन करावे, यात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन शेखावत यांनी राज्यांना केले.

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane

 

 


(रिलीज़ आईडी: 1583136) आगंतुक पटल : 168
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English