महिला आणि बालविकास मंत्रालय

केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पोषण अभियान पुरस्कारांचे वितरण

Posted On: 23 AUG 2019 10:17PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2019

 

केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयाकडून पोषण अभियानासाठी राज्य सरकारे, जिल्हा चमू, पंचायत स्तरावरील चमू आणि प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात असलेल्यांचा नवी दिल्ली येथे पोषण अभियान पुरस्कार सोहळा २०१८-१९ मध्ये गौरव करण्यात आला. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी, महिला व बालकल्याण राज्यमंत्री देबश्री चौधरी, महिला व बालकल्याण सचिव रविंद्र पवार, अतिरिक्त सचिव अजय तिडके आणि सह सचिव सज्जन सिंग यादव यांची याप्रसंगी उपस्थिती होती. 

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, मिझोराम, राजस्थान, तामिळनाडू, उत्तराखंड आणि चंदीगड, दमण-दीव, दादरा-नगर हवेली यांना प्रमाणपत्र आणि रोख पारितोषक देण्यात आले. पहिल्या स्थानासाठी एक कोटी, दुसऱ्या स्थानासाठी ५० लाख, एकूण सरस कामगिरीसाठी प्रथम पारितोषक दीड कोटी, दुसऱ्या स्थानासाठी ७५ लाख, तसेच जिल्हा स्तरावरील १९ जिल्ह्यांचे ५३ अधिकारी, पंचायत स्तरावरील ५० अधिकाऱ्यांचा प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

तसेच चांगली सेवा बजावणाऱ्या २३७ अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, महिला निरीक्षक, आशा यांना प्रत्येकी ५०,००० रुपये, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. एकूण ३६३ पोषण अभियान पारितोषके प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी श्रीमती स्मृती इराणी यांच्या हस्ते #ThankyouAnganwadiDidi- या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले.

 

S.Thakur/P.Kor



(Release ID: 1582921) Visitor Counter : 137


Read this release in: English