पंतप्रधान कार्यालय

अरुण जेटली यांच्या निधनावर पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

Posted On: 24 AUG 2019 2:43PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते अरुण जेटली यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

अरुण जेटली हे राजकारणातील दिग्गज व्यक्तीमत्व, विद्वान आणि कायदेतज्ज्ञ होते. देशाच्या विकासात त्यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांचे निधन दुःखद आहे. पत्नी संगीताजी आणि मुलगा रोहन यांच्याशी मी बोललो. ओम शांती. 

अतिशय विद्वान, विनोदाची जाण असलेले करिश्माई व्यक्तीमत्व होते. अरुण जेटलींना समाजाच्या सर्व स्तरातील लोकांनी आपलेसे केले होते. ते बहुआयामी व्यक्तीत्व होते. भारताची राज्यघटना, इतिहास, धोरणे, शासन आणि प्रशासन यांचा प्रचंड अभ्यास होता.

आपल्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत, अरुण जेटली जी यांनी विविध मंत्रालयाचे कामकाज पाहिले. त्यांचे देशाच्या आर्थिक विकासात योगदान आहे, तसेच आपल्या संरक्षण क्षेत्राची मजबूती केली, मैत्रीपूर्ण कायदे करुन परदेशाशी व्यापार वृद्धींगत केला.

भारतीय जनता पक्ष आणि अरुण जेटली यांचे अतूट नाते होते. आणीबाणीच्या काळात विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व करत देशाच्या लोकशाहीचे रक्षण केले.

अरुण जेटली जी यांच्या निधनाने, मी जवळचा मित्र गमावला. ते अतिशय उत्कृष्ट जीवन जगले आणि आनंदी स्मृती मागे सोडून गेले. आम्हाला त्यांची सदैव आठवण येईल ,  असे पंतप्रधान म्हणाले.

 

S.Thakur/P.Kor

 


(Release ID: 1582879) Visitor Counter : 153
Read this release in: English