कंपनी व्यवहार मंत्रालय

विदेशी आस्थापनांकडून भारतीय आस्थापनांचा दुरुपयोग होऊ नये यादृष्टीने सीसीआयने त्यांची काळजी घ्यावी-केंद्रीय वित्तमंत्री

Posted On: 23 AUG 2019 5:19PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2019

 

परदेशी आस्थानांकडून भारतीय आस्थापनांचा दुरुपयोग होण्यापासून भारतीय उपक्रमे सुरक्षित राहावीत याची सीसीआय अर्थात भारतीय स्पर्धात्मकता आयोगाने खातरजमा करावी असे आवाहन केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सितारमण यांनी केले आहे. सीसीआयच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या.

सीसीआयने संपूर्ण जगातल्या बाजारपेठेविषयक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले पाहिजे. मोठ्या कंपन्या एका देशाच्या न्यायालयीन कक्षेत तर त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र अन्यत्र असते यामुळे नियामकासाठी मोठे आव्हान निर्माण होते, असे सांगून आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मकता धोरण हे मोठे आव्हान असल्याचे वित्तमंत्री म्हणाल्या.

भारतासारख्या मुक्त अर्थव्यवस्थेत, स्पर्धेत अडथळा न आणता सीसीआय अतिशय संयमाने कार्य करत असल्याचे सांगून त्यांनी सीसीआयची प्रशंसा केली.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Kor



(Release ID: 1582759) Visitor Counter : 80


Read this release in: English