पंतप्रधान कार्यालय

संसद सदनाच्या प्रकाशयोजनेचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

प्रविष्टि तिथि: 13 AUG 2019 10:18PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार दि. 13 ऑगस्ट 2019 रोजी संध्याकाळी भारताच्या स्वातंत्र्य दिनासाठी जय्यत तयारी असलेल्या संसद सदनाच्या प्रकाशयोजनेचे उद्‌घाटन केले. पंतप्रधानांनी यावेळी लाईट शो या कार्यक्रमाचा काही भागाचे अवलोकन केले. ही प्रकाशयोजना राष्ट्रपती भवन, साऊथ आणि नॉर्थ ब्लॉक यासारख्या महत्त्वाच्या सरकारी इमारतींवर करण्यात आली आहे. ही प्रकाशयोजना नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय असून यामुळे लोकप्रियता वाढली आहे. जास्तीत जास्त लोक या प्रकाशयोजनेमुळे दिल्लीला या काळात भेट देतात.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1582175) आगंतुक पटल : 93
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English