गृह मंत्रालय

स्वातंत्र्यदिन 2019 निमित्त सेवा/शौर्य पदकांना राष्ट्रपतींची मंजुरी

Posted On: 14 AUG 2019 3:37PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2019

 

स्वातंत्र्यदिन 2019 निमित्त एकूण 946 पोलीस कर्मचाऱ्यांना पदके जाहीर झाली आहेत. तीन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक, 177 कर्मचाऱ्यांना पोलीस शौर्य पदके, 89 कर्मचाऱ्यांना अतुलनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक तर 677 कर्मचाऱ्यांना उत्तम सेवेसाठी पोलीस पदके जाहीर झाली आहेत.

180 शौर्य पुरस्कारांपैकी 114 जणांना जम्मू आणि काश्मीरमधल्या धाडसी कारवाईसाठी, 62 जणांना नक्षलग्रस्त भागातील धाडसी कारवाईसाठी आणि इशान्य भागातील कारवाईसाठी चार जणांना शौर्य पुरस्कार जाहीर झाले आहेत. शौर्य पुरस्कार मिळवणाऱ्यांमध्ये सीआरपीएफचे 72, जम्मू आणि काश्मीर पोलीस दलातील 61, ओदिशातील 23, छत्तीसगडमधील 9 आणि उर्वरित पुरस्कार विजेते अन्य राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील आहेत.

पुरस्‍कार विजेत्यांची यादी

 

M.Chopade/S.Kane/P.Kor



(Release ID: 1581952) Visitor Counter : 102


Read this release in: English