मंत्रिमंडळ

भारत आणि ट्युनिशिया दरम्यान शांततापूर्ण उद्देशांसाठी बाह्य अंतराळाचा शोध आणि वापर यातील सहकार्याबाबत सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 05 AUG 2019 3:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2019

 

पंतप्रधान नरेन्‍द्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि ट्युनिशिया दरम्यान शांततापूर्ण उद्देशांसाठी बाह्य अंतराळाचा शोध आणि वापर यातील सहकार्याबाबत सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली आहे. 

या करारावर बंगळुरू इथं 11 जून 2019 रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या.

प्रभाव :-

  • या करारामुळे पृथ्‍वीचे रिमोर्ट सेंसिंग,  उपग्रह संचार, उपग्रह आधारित नेविगेशन, अंतराळ विज्ञान आणि ग्रहीय शोध यासारख्या क्षेत्रात तसेच अंतराळ यान,  अंतराळ प्रणाली ,भूतल प्रणाली आणि अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर या क्षेत्रात सहकार्य करता येईल.
  • या करारामुळे अंतराळ विभाग/ इसरो, भारत आणि नॅशनल सेंटर फॉर कार्टोग्राफी अँड रिमोर्ट सेंसिंग, ट्यूनीशियाच्या सदस्यांचा एक संयुक्‍त कृतीगट स्थापन करण्यास मदत होईल . हा गट निर्धारित मुदत आणि कराराच्या अंमलबजावणीच्या पध्दतीसह कृती आराखडा तयार करेल.

पृष्‍ठभूमि:-

ट्यू‍नीशियाच्या संदेशवहन तंत्रज्ञान आणि डिजिटल अर्थव्‍यवस्‍था मंत्र्यांनी जुलै 2015 मध्ये भारत दौऱ्यादरम्यान भारताबरोबर अंतराळ सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. ट्युनीशिया अंतराळ कार्यक्रम सुरु करण्याच्या प्रक्रियेत असून यासाठी इसरोच्या अनुभवातून शिकण्यासाठी उत्सुक आहे.याचाच एक भाग म्हणून बंगळुरू इथं भारत आणि ट्यूनीशिया यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

 

 B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1581518) Visitor Counter : 137


Read this release in: English