वस्त्रोद्योग मंत्रालय

5 वा राष्ट्रीय हातमाग दिवस संपन्न

Posted On: 07 AUG 2019 5:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2019

 

देशभरात आज विविध राज्यांमध्ये 16 एनआयएफटी संकुलांमध्ये आणि विणकर सेवा केंद्रांमध्ये पाचव्या राष्ट्रीय हातमाग दिवसाचे आयोजन करण्यात आले. गांधीनगर आणि कोलकाता येथील एनआयएफटी संकुलामध्ये या निमित्ताने हातमाग मेळा आणि प्रदर्शन, कार्यशाळा, चर्चासत्र यांचे आयोजन करण्यात आले.

दिल्लीमध्ये होणारे राष्ट्रीय हातमाग दिवसाचे कार्यक्रम माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे रद्द करण्यात आले.

ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. उद्योग, हातमाग, हस्तकला आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री पद्मिनी दियान या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. या निमित्ताने

  1. अखिल भारतीय हातमाग संख्या अहवालाचे यावेळी प्रकाशन झाले. लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
  2. इग्नू आणि एनआयओएसच्या माध्यमातून कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विणकरांना उपलब्ध असलेल्या संधीची माहिती देण्यात आली.
  3. हातमाग क्षेत्रातील नामवंत आणि तरुण रचनाकार यांच्यात झालेल्या संवादाचे ट्विटरवर थेट प्रक्षेपण करण्यात आले.

 

B.Gokhale/S.Patil/P.Malandkar

 


(Release ID: 1581459) Visitor Counter : 174


Read this release in: English