गृह मंत्रालय
मानसिक आरोग्य क्षेत्रात उपलब्ध सुविधा आणि गरजांमध्ये मोठी तफावत असल्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एच.एल.दत्तू यांचे मत
Posted On:
07 AUG 2019 3:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2019
देशात मानसिक आरोग्य क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रयत्न होत असूनही या क्षेत्राच्या गरजा आणि उपलब्ध असलेल्या सुविधा यांच्यात खूप मोठी तफावत असल्याचे मत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एच.एल.दत्तू यांनी व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली येथे इंडिया इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित केलेल्या मानसिक आरोग्यावरील राष्ट्रीय आढावा बैठकीचे उद्घाटन करताना ते आज बोलत होते. मानवाधिकार आयोगासाठी ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या देशात 13,500 मानसोपचार तज्ञांची गरज आहे. मात्र केवळ 3827 उपलब्ध आहेत तसेच 20,250 वैद्यकीय मानसशास्त्रज्ञांची गरज आहे. मात्र केवळ 898 उपलब्ध आहेत. निम वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा देखील तुटवडा आहे असे ते म्हणाले.
B.Gokhale/S.Patil/P.Malandkar
(Release ID: 1581437)
Visitor Counter : 221