आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राष्ट्रीय डिजिटल आरोग्य पथदर्शी आराखडा अहवालासाठी आरोग्य मंत्रालयाने आयोजित केलेल्या चर्चेसाठी संबंधितांना निमंत्रण
प्रविष्टि तिथि:
01 AUG 2019 6:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2019
राष्ट्रीय डिजिटल आरोग्य पथदर्शी आराखडा अहवालावर सूचना मागविण्यासाठी, आरोग्य मंत्रालयाने सर्व संबंधितांची 6 ऑगस्टला नवी दिल्लीत चर्चा आयोजित केली आहे. स्पीकर हॉल, कॉन्स्टीट्युशन क्लब ऑफ इंडिया, रफी मार्ग, आरबीआय बँकमागे, संसद मार्ग परिसर येथे सकाळी साडे दहा वाजता ही चर्चा होणार आहे. सर्व संबंधितांनी सकाळी दहा वाजण्यापूर्वी या ठिकाणी आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.
आरोग्य मंत्रालयाने गठित केलेल्या समितीने जागतिक उत्तम प्रथांचा अभ्यास केल्यानंतर राष्ट्रीय डिजिटल आरोग्य पथदर्शी आराखडा तयार केला आहे. 15 जुलैला हा आराखडा जनतेकडून सूचनेसाठी 29 ला करण्यात आला.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1581062)
आगंतुक पटल : 169
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English