वस्त्रोद्योग मंत्रालय

वस्त्रोद्योग सचिव म्हणून रवी कपूर यांनी पदभार स्वीकारला

Posted On: 01 AUG 2019 5:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2019

 

भारतीय प्रशासकीय सेवेतल्या 1986 च्या तुकडीतले अधिकारी रवी कपूर यांनी आज नवी दिल्लीत वस्त्रोद्योग सचिव म्हणून पदभार स्वीकारला.

2016 ते 2019 या काळात आसामचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून ते काम पाहत होते. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सहसचिव म्हणून तसेच पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेचे कार्यकारी संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

जागतिक बँक, युरोपियन महासंघ, संयुक्त राष्ट्र यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थासमवेत काम करण्याचा रवी कपूर यांना व्यापक अनुभव आहे.  

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 

 


(Release ID: 1581056) अभ्यागत कक्ष : 153
Read this releasein: English