आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

2019-20 या वर्षासाठी फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांसाठी पोषण आधारित अनुदानाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 31 JUL 2019 6:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 जुलै 2019

 

2019-20 या वर्षासाठी, फॉस्फेटिक आणि पोटॅश खतांसाठी,पोषण आधारित अनुदान निश्चित करावे यासाठीच्या, खत विभागाच्या प्रस्तावाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली,केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या आज झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

प्रति किलो अनुदान दर(रुपयांत)

N (नायट्रोजन)

 

P(फॉस्फरस)

 

K(पोटॅश)

 

S(सल्फर)

 

18.901

 

15.216

 

11.124

 

3.562

 

 

अधिसूचनेच्या आधी, 2018-19 या वर्षासाठीचे प्रति किलो अनुदान दर लागू राहतील.

खर्च:-

2019-20 या वर्षासाठी, फॉस्फेटिक आणि पोटॅश खत अनुदानासाठी 22875.50 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

लाभ:-

यामुळे उत्पादकांना आणि आयातदारांना,खतांसाठी,पुरवठा करार करण्यासाठी मदत त्याच बरोबर 2019-20 या वर्षासाठी शेतकऱ्यांना खत उपलब्धता राहण्यासाठी मदत होणार आहे.

पूर्वपीठिका:-

केंद्र सरकार, शेतकऱ्यांना खत उत्पादकांद्वारे, अनुदानित दरात युरिया तसेच फॉस्फेटिक आणि पोटॅश श्रेणीतली 21 खते उपलब्ध करून देण्यात येत आहे. शेतकरी कल्याण दृष्टिकोनातून, शेतकऱ्यांना, फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खते, माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी,सरकार कटिबद्ध आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 



(Release ID: 1580923) Visitor Counter : 285


Read this release in: English