अणुऊर्जा विभाग

अणू उर्जा विभागाची कामगिरी

प्रविष्टि तिथि: 25 JUL 2019 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जुलै 2019

 

कैगा अणू उर्जा निर्मिती केंद्राच्या युनिट एक  मधून 962  दिवस सलग कार्य सुरु ठेवून जागतिक विक्रम, जगातली सर्वात जुनी अणुभट्टी असलेल्या तारापूर अणू उर्जा प्रकल्पाच्या युनिट 1 आणि 2 मधे  सुरक्षित कार्याची 50 वर्ष  यासह अणू उर्जा विभागाने गेल्या तीन वर्षात लक्षणीय कामगिरी केली आहे. केंद्रीय अणू उर्जा आणि अवकाश राज्य मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी आज राज्य सभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

तामिळनाडुतल्या  कुदानकुलम प्रकल्पाच्या के. के. एन. पी. पी -2 च्या पुर्णत्वामुळे 1000 मेगावाट अतिरिक्त अणू उर्जा क्षमता प्राप्त झाली आहे. इंधन पुरवठ्यासह अणू उर्जा सहकार्यासाठी परदेशांशी सक्षम करार,मध्यप्रदेशातल्या चुटका अणू उर्जा प्रकल्प उभारणीसाठी पर्यावरण विषयक मंजुरी यांचा या कामगिरीत समावेश आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar


(रिलीज़ आईडी: 1580301) आगंतुक पटल : 142
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English