माहिती आणि प्रसारण मंत्रालय

दूरदर्शनच्या 8 स्टूडीओ मधे व्हिडिओ वॉल आणि दिल्ली दूरदर्शन केंद्रात अर्थ स्टेशनचे प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते उद्‌घाटन


कार्यक्रमांचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी दूरदर्शन करिता लवकरच सर्जनशील प्रमुख – प्रकाश जावडेकर

Posted On: 25 JUL 2019 4:02PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जुलै 2019

 

दूरदर्शनच्या 8 स्टूडीओ मधे व्हिडिओ वॉल आणि दिल्ली दूरदर्शन केंद्रात अर्थ स्टेशनचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज उद्‌घाटन झाले.

प्रेक्षकांना  कार्यक्रमाचा उत्तम दर्जा अनुभवण्याच्या दृष्टीने व्हिडीओ वॉलचे महत्व जावडेकर यांनी अधोरेखित केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या तीन वर्षाच्या कृती आराखड्याअंतर्गत, दूरदर्शनच्या पायाभूत संरचनेच्या  आधुनिकीकरणासाठी सहाय्य करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. व्हिडीओ वॉल आणि स्पेक्ट्रम सक्षम उपग्रह साधन म्हणजे त्या दृष्टीने टाकलेले एक पाऊल असल्याचे  ते म्हणाले. दूरदर्शनच्या भूमिकेची प्रशंसा करताना,दूरदर्शन म्हणजे विश्वासार्हता असे  समीकरणच असल्याचे ते म्हणाले.

डीडी फ्री डिशचा सध्याचा 3.25 कोटी घरापर्यंत असलेला विस्तार आणखी व्यापक करून तो 5 कोटी घरापर्यंत करण्याच्या दृष्टीने काम करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले. कार्यक्रमाना अधिक चालना देण्यासाठी आणि अधिक दर्जेदार आशयघन निर्मितीसाठी लवकरच दूरदर्शन करिता सर्जनशील प्रमुख नेमणार असल्याचे ते म्हणाले.

दूरदर्शन आणि आकाशवाणीने देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत दर्जेदार सेवा पुरवावी यासाठी आवश्यक ते सर्व सहाय्य करण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांनी सांगितले.

प्रसार भारतीचे  अध्यक्ष ए सूर्यप्रकाश यांनी दूरदर्शनच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि  सरकारच्या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रभावी कार्यक्रमांची निर्मिती दूरदर्शनने  नजीकच्या काळात केल्याचे त्यांनी सांगितले.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या तीन वर्षाच्या कृती आराखड्याअंतर्गत बसवण्यात आलेल्या या  व्हिडीओ वॉलसाठी 10.75 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.

स्पेक्ट्रम सक्षम तंत्रज्ञानावर आधारित अर्थ  स्टेशनमुळे त्याच बेंडवीडथमधे वाहिन्यांची संख्या दुप्पट करण्याची क्षमता प्राप्त होणार आहे.

अर्थ स्टेशन पूर्वपीठीका-

दिल्ली दूरदर्शन केंद्राच्या 9 वाहिन्यांच्या उपग्रह अपलिंक सुविधेला अर्थ स्टेशन असे संबोधले जाते.2007 मधे ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 



(Release ID: 1580269) Visitor Counter : 302


Read this release in: English