पंतप्रधान कार्यालय

‘चंद्र शेखर - द लास्ट आयकॉन ऑफ आयडॉलॉजीकल पॉलीटिक्स’ या पुस्तकाचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन

Posted On: 24 JUL 2019 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जुलै 2019

 

चंद्र शेखर - द लास्ट आयकॉन ऑफ आयडॉलॉंजीकल पॉलीटिक्सया पुस्तकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रकाशन करण्यात आले.राज्यसभेचे उप सभापती हरिवंश आणि रवी दत्त बाजपेयी यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.

पंतप्रधानांनी, या पुस्तकाची पहिली प्रत, उप राष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना सादर केली.

माजी पंतप्रधान चंद्र शेखर जी यांच्या निधनाला 12 वर्षे उलटल्यानंतरही, आजच्या राजकीय संदर्भात,चंद्र शेखर यांचे विचार आपल्याला मार्गदर्शन करत आहेत ही लक्षणीय बाब असल्याचे पंतप्रधान म्हणाले.या पुस्तकाच्या लेखनाबद्दल हरिवंश यांचे अभिनंदन करतानाच पंतप्रधानांनी,चंद्र शेखर यांच्या समवेतच्या काही आठवणींना उजाळा दिला.

1977 मधे आपण चंद्र शेखरजी यांची पहिल्यांदा भेट घेतली होती याचे स्मरण पंतप्रधानांनी केले. माजी उपराष्ट्रपती  भैरोसिंह शेखावत यांच्या समवेत प्रवास करताना दिल्ली विमानतळावर चंद्र शेखर यांची भेट झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. भिन्न राजकीय विचारधारा असूनही या दोन नेत्यांमध्ये घनिष्ठ संबंध होते.

चंद्र शेखर, हे अटल बिहारी वाजपेयी यांना गुरुजी म्हणून संबोधत असत अशी आठवण पंतप्रधानानी सांगितली. त्यांच्या काळात मजबूत असलेल्या राजकीय पक्षाला,त्यांच्या काही बाबी पटत नसल्याने त्यांना  विरोध करायला चंद्रशेखर जराही कचरले नाहीत असे सांगून तत्वाला  धरून राहणारी व्यक्ती असे त्यांचे वर्णन पंतप्रधानांनी केले.

मोहन धारिया आणि  जॉर्ज फर्नाडीस हे नेते चंद्र शेखर यांचा आदर करत असत असे ते म्हणाले.

चंद्र शेखर यांच्या समवेत झालेल्या शेवटच्या भेटीचे स्मरण  पंतप्रधानांनी केले.चंद्रशेखर हे  आजारी असताना त्यांनी दूरध्वनीवरून संवाद साधत, दिल्लीत असाल तेव्हा आपल्याला भेटण्याचा संदेश दिल्याचे पंतप्रधान म्हणाले. या भेटी दरम्यान त्यांनी गुजरातच्या प्रगतीविषयी चौकशी केली आणि अनेक राष्ट्रीय महत्वाच्या मुद्द्यांवर आपले विचार मांडल्याचे पंतप्रधान म्हणाले.

चंद्र शेखर यांची वैचारिक सुस्पष्टता,जनतेप्रती कटी बद्धता,लोकशाही मुल्यांप्र्ती निष्ठा यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली.

शेतकरी,गरीब आणि वंचितांसाठी चंद्रशेखर यांनी काढलेल्या पदयात्रेचे स्मरण पंतप्रधानांनी केले.त्यांना त्यांच्या काळात योग्य तो सन्मान देण्यात अपयशी ठरल्याबद्दल पंतप्रधानांनी खंत व्यक्त केली.

एका कंपूने डॉ आंबेडकर,सरदार पटेल यासारख्या महान भारतीय नेत्यांची प्रतिकूल छबी निर्माण करण्याचा प्रयत्न केला.दिल्लीत, सर्व माजी पंतप्रधानाची माहिती देणारे संग्रहालय उभारण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.माजी पंतप्रधानांच्या जीवनाचे विविध पैलू आणि त्यांचे कार्य या विषयी माहिती देण्याचे आवाहन त्यानी माजी पंतप्रधानांच्या कुटुंबियांना केले. देशाला नव्या राजकीय संस्कृतीची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला,राज्य सभेचे उप सभापती हरिवंश,राज्य सभेतले विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद या कार्यक्रमाला उपस्थित होते.त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 

 


(Release ID: 1580215) अभ्यागत कक्ष : 313
Read this releasein: English