राष्ट्रपती कार्यालय

प्रसिद्धी पत्रक

Posted On: 20 JUL 2019 2:00PM by PIB Mumbai

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना खालील पदांवरच्या नियुक्या जाहीर करतांना अतिशय आनंद होत आहे. 

  1. मध्यप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, यांची उत्तरप्रदेशच्या राज्यपाल पदी नेमणूक करण्यात आली आहे.
  2. जगदीप धनाखर यांची पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  3. त्रिपुराच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  4. बिहारचे राज्यपाल लाल जी टंडन यांची मध्यप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  5. बिहारच्या राज्यपालपदी फागु चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  6. आर एन रवी यांची नागालँडच्या राज्यपाल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

ह्या सर्व विहित पदांचा कार्यभार संबंधित मान्यवरांनी सांभाळल्यापासून ह्या नियुक्त्या लागू होतील.  

*******

Sonal Tupe/Radhika Aghor

 


(Release ID: 1579633) अभ्यागत कक्ष : 154