सांस्कृतिक मंत्रालय

संगीत नाटक अकादमी फेलोशिप्स (अकादमी रत्न) आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार 2018 जाहीर

Posted On: 16 JUL 2019 5:09PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 16 जुलै 2019

 

संगीत नाटक अकादमीने एकमताने झाकीर हुसेन, सोनल मानसिंग, जतीन गोस्वामी आणि के. कल्याणसुंदरम पिल्लई यांची संगीत नाटक अकादमी फेलो (अकादमीरत्न) म्हणून निवड केली आहे. तीन लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल अशा स्वरुपात निवड झालेल्या व्यक्तींचा गौरव केला जातो.

अकादमीची फेलोशिप अत्यंत प्रतिष्ठेचा आणि दुर्मिळ बहुमान मानला जातो.

संगीत, नाटक, नृत्य, आदिवसी संगीत, लोककला अशा विविध क्षेत्रातल्या योगदानासाठी देण्यात येणाऱ्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारांसाठी 44 कलाकारांची निवड करण्यात आली आहे.

संगीत क्षेत्रात 11 जणांना पुरस्कार जाहीर झाला असून सुगम संगीतासाठी सुरेश वाडकर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.

नृत्य क्षेत्रात पुरस्कारासाठी 9 जणांची निवड करण्यात आली आहे.

नाट्यक्षेत्रात 9 जणांची निवड करण्यात आली असून राजीव नाईक यांना नाट्यलेखनासाठी तर सुहास जोशी यांना अभिनयासाठी पुरस्कार घोषित झाला आहे.

पारंपरिक/लोककला/आदिवासी संगीत/कळसुत्री बाहुल्यांचा खेळ या क्षेत्रात 10 कलाकारांची निवड झाली आहे.

ताम्रपत्र, शाल आणि एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

 

संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेत्यांच्या यादीसाठी येथे क्लिक करा

 

S.Tupe/S.Kakade/P.Kor

 


(Release ID: 1578940)
Read this release in: English