माहिती आणि प्रसारण मंत्रालय

सर्वोत्कृष्ट पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्कारासाठी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाने मागवल्या प्रवेशिका


प्रवेशिका पाठवण्याची अंतिम मुदत 30 ऑगस्ट 2019

Posted On: 12 JUL 2019 4:52PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 जुलै 2019

 

सर्वोत्कृष्ट पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्कार 2019 साठी प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाने प्रवेशिका मागवल्या आहे. एकूण 8 प्रकारात पुरस्कार दिले जातील.

 

अ.क्र.

प्रकार

रोख रक्कम

1

सर्वोत्कृष्ट पत्रकारितेसाठी राजा राम मोहन रॉय राष्ट्रीय पुरस्कार

रु. 100000/-

2

ग्रामीण पत्रकारिता

रु. 50000/-

3

विकासविषयक वृत्तांकन

रु. 50000/-

4

छायाचित्र पत्रकारिता:

i) सिंगल न्यूज पिक्चर

ii) फोटो फिचर

 

रु. 50000/-

रु. 50000/-

5

सर्वोत्कृष्ट वृत्तपत्र कला : कार्टून्स, व्यंगचित्र, चित्र

रु. 50000/-

6

क्रीडा वृत्तांकन/क्रीडा फोटो फिचर

रु. 50000/-

7

वित्तीय वृत्तांकन

रु. 50000/-

8

लिंग समानतेच्या मुद्यावरील वृत्तांकन

रु. 50000/-

 

सर्वोत्कृष्ट पत्रकारितेसाठी देण्यात येणाऱ्या राजा राम मोहन रॉय पुरस्कारासाठी परीक्षक समिती स्वत:च निर्णय घेणार असल्याने यासाठी प्रवेशिका आमंत्रित करण्यात आलेल्या नाहीत.

प्रवेशिका, पात्रता, प्रक्रिया याबाबतची माहिती प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियाच्या www.presscouncil.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. प्रवेशिका बंद लिफाफ्यात सचिव, प्रेस काऊन्सिल ऑफ इंडिया, सूचना भवन, 8-सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली-110003 या पत्त्यावर पाठवाव्यात. प्रवेशिका 30 ऑगस्ट 2019 पर्यंत (संध्याकाळी 5 वाजेपर्यंत) पोहोचणे आवश्यक आहे. आगाऊ पत ई-मेलद्वारे पाठवता येईल.

 

B.Gokhale/S.Kakade/P.Kor

 



(Release ID: 1578570) Visitor Counter : 94


Read this release in: English