अर्थ मंत्रालय

विमा मध्यस्थ कंपन्यात 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याचा केंद्रीय अर्थ संकल्पात प्रस्ताव

Posted On: 05 JUL 2019 7:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जुलै 2019

 

विमा मध्यस्थ कंपन्यां मधे 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याचा प्रस्ताव अर्थ संकल्पात आहे. केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत 2019-20 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. एकल ब्रान्ड किरकोळ क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीसाठीचे स्थानिक स्तरावरचे आपूर्ती निकष शिथिल करण्याचाही प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.

जागतिक स्तरावर फारसे आशादायी वातावरण नसले तरीही भारतात थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ जोमदार राहिला. 2018 मधे जागतिक थेट परकीय गुंतवणुकीत 13 टक्के घट झाली असून सलग तिसऱ्या वर्षी   घट नोंदवण्यातआल्याचे युएनसीटीएडी च्या जागतिक गुंतवणूक अहवाल 2019 मधे स्पष्ट करण्यात आले आहे.

2018-19 या वर्षात भारतातला परदेशी गुंतवणुकीचा ओघ  64.375 अब्ज अमेरिकी डॉलर्स असा मजबूत राहून गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे असे वित्त मंत्र्यांनी सांगितले.

 

थेट परकीय गुंतवणुकीसाठी भारत अधिक आकर्षक स्थान ठरावे यासाठी

हवाई,माध्यम( अनिमेशन,एव्हीजीसी) आणि विमा क्षेत्रात संबंधीतांशी चर्चा करून ही क्षेत्र थेट परकीय गुंतवणुकीला आणखी खुली करण्याच्या सूचना सरकार तपासेल.

विमा मध्यस्त कंपन्यांसाठी 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी  एकल ब्रान्ड किरकोळ क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीसाठीचे स्थानिक स्तरावरचे आपूर्ती निकष शिथिल करण्याचाही प्रस्तावअसल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

B.Gokhale/N.Chilate/D.Rane


(Release ID: 1577573)
Read this release in: English