पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2019-2020 ची प्रशंसा केली
या अर्थसंकल्पामुळे 21 व्या शतकातील भारताच्या विकासाला चालना मिळेल-पंतप्रधान
Posted On:
05 JUL 2019 6:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जुलै 2019
केंद्रीय अर्थसंकल्प 2019-2020 ‘नव भारताच्या निर्मितीचा’ अर्थसंकल्प आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अर्थसंकल्पाची प्रशंसा केली.
अर्थमंत्र्यांनी संसदेत 2019-20 वर्षासाठी वार्षिक अर्थसंकल्प सादर केल्यानंतर जारी केलेल्या निवेदनात पंतप्रधान म्हणाले की, या अर्थसंकल्पामुळे गरीबांचे सक्षमीकरण होईल आणि देशातील युवकांसाठी उत्तम भवितव्य निर्माण होईल.
अर्थसंकल्पातील संभाव्य लाभ अधोरेखित करत पंतप्रधान म्हणाले की, या अर्थसंकल्पामुळे देशाच्या विकासाचा वेग वाढेल आणि माध्यम वर्गाला मोठया प्रमाणावर लाभ होईल. या अर्थसंकल्पामुळे कर संबंधी प्रक्रिया सुलभ होईल आणि देशातील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यात मदत मिळेल असे ते म्हणाले.
या अर्थसंकल्पामुळे उद्योग आणि उद्योजक दोघांनाही चालना मिळेल. या अर्थसंकल्पामुळे देशाच्या विकसत महिलांचा सहभाग आणखी वाढेल असे पंतप्रधान म्हणाले. या अर्थसंकल्पात देशाच्या कृषी क्षेत्राचे परिवर्तन करण्याचा आराखडा असल्याचे ते म्हणाले.
2019 -2020 वर्षाचा हा अर्थसंकल्प आशा-आकांक्षांनी भरलेला आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी या अर्थसंकल्पाचे वर्णन केले. या अर्थसंकल्पामुळे 21 व्या शतकात भारताच्या विकासाला चालना मिळेल असे त्यांनी सांगितले.
गरीब, शेतकरी, दलित, पीडित आणि समाजातील वंचित वर्गाच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने सर्वंकष पावले उचलली आहेत असे पंतप्रधान म्हणाले. या सशक्तीकरणाने पुढील पाच वर्षांत ते देशाची ताकद बनतील असे ते म्हणाले. या वर्गांच्या सक्षमीकरणामुळे पाच ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्थस्था बनण्याचे स्वप्न पूर्ण करायला देशाला ऊर्जा मिळेल असे पंतप्रधानांनी नमूद केले.
B.Gokhale/S.Kane/D.Rane
(Release ID: 1577534)