अर्थ मंत्रालय

2019 -20 दरम्यान सरकारतर्फे1लाख 5हजार कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट


धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी अधिक केंद्रीय सार्वजनिक उपक्रम
निर्गुंतवणुकीच्या पुर्नप्रक्रियेद्वारे एअर इंडियात धोरणात्मक निर्गुंतवणुक प्रस्तावित

Posted On: 05 JUL 2019 5:47PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 जुलै 2019

 

2019 -20 या आर्थिक वर्षासाठी सरकारने 1,05, 000 कोटी रुपयांच्या निर्गुंतवणुक  वाढीव लक्ष्य निर्धारित केले असल्याचे  संसदेत   केंद्रीय अर्थसंकल्‍प सादर करतांना केंद्रीय वित्‍त मंत्री आणि कंपनी व्‍यवहार मंत्री श्रीमती. निर्मला सितारमन यांनी आज सांगितले. सरकार सार्वजनिक उपक्रमांची धोरणात्मक विक्री करणार असून फायदेशीर नसलेल्या क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांचे  एकत्रीकरण करत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

फायदेशीर नसलेल्या सार्वजनिक उपक्रमांमध्ये निर्गुंतवणुकीच्या संदर्भात त्यांनी सांगितले की सरकारचे भागभांडवल अशा निर्गुंतवणुकीत 51 टक्क्यांपेक्षा कमी न ठेवण्याच्या धोरणाचे पालन सरकारद्वारे केले गेले आहे,अशी माहिती त्यांनी दिली. योग्य पातळीवर 51 टक्क्यांपेक्षा खाली जाणाऱ्या उपक्रमांना सरकारी नियंत्रणात  अद्याप  ठेवायचे असतील तर, सरकार अशा बाबतीत केस टू केसविचार करीत आहे . शासकीय नियंत्रित संस्थांच्या 51 टक्के हिस्सेदारीसह सरकारी हिस्सेदारीचे  51 टक्के राखण्यासाठीच्या वर्तमान धोरणात सुधारणा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, निवडक केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांची धोरणात्मक  निर्गुंतवणुक ही या सरकारची प्राथमिकता राहील. सध्याच्या  समष्टि अर्थशास्त्रास्त्राच्या मापदंडच्या दृष्टीने सरकार  केवळ एअर इंडियाच्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीची प्रक्रिया पुन्हा सुरू करेल, परंतु खाजगी क्षेत्राद्वारे धोरणात्मक सहभागासाठी अधिक केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांना आमंत्रणही देईल.

G.C/D.W/P.M

 

 

 

 


(Release ID: 1577520) Visitor Counter : 139


Read this release in: English