मंत्रिमंडळ
अहमदाबाद, मेंगलुरु आणि लखनौ विमानतळ खाजगी सार्वजनिक भागिदारीत भाडेतत्वावर देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
प्रविष्टि तिथि:
03 JUL 2019 5:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जुलै 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत भारतीय विमानतळ प्राधिकरण मालकीच्या अहमदाबाद, लखनौ आणि मेंगलुरु येथील विमानतळे भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. सर्वोच्च बोली लावणाऱ्या अदानी एंटरप्रायजेस लिमिटेडला 50 वर्षांसाठी या विमानतळांच्या देखभाल, व्यवस्थापन आणि विकासाची जबाबदारी देण्यात येईल.
प्रभाव:
यामुळे विमान वाहतुकीत वेग, कौशल्य, कार्यक्षमता आणि व्यावसायिकता वाढीस लागेल. तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरणाचा महसूल वाढेल, तसेच छोट्या शहरांमधे विमान सेवेसाठी गुंतवणूक मिळण्यास मदत होईल. सार्वजनिक क्षेत्रात आवश्यक असलेली गुंतवणूक येण्यासाठीही मदत होईल.
B.Gokhale/M.Chopade/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1576893)
आगंतुक पटल : 174
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English