पंतप्रधान कार्यालय
G- 20 परिषदेच्या अनौपचारिक सभेत ब्रिक्स राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांनी दिलेल्या संयुक्त निवेदन
Posted On:
28 JUN 2019 7:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जून 2019
- जपान येथील ‘ओस्का’ येथे जी-20 परिषदेच्या निमित्ताने आम्ही आज दिनांक 28 जुन रोजी ब्राझिल, रशिया ,भारत आणि दक्षिण आफ्रिका या राष्ट्रांचे राष्ट्रप्रमुख एकत्रित आलो आहोत. आम्ही G-20 परिषदेसाठी जपानच्या राष्ट्राध्यक्षांनी औचित्यपूर्ण केलेल्या स्वागतासाठी त्यांचे अभिनंदन करतो.
- जी-20 परिषदेसाठी जपान राष्ट्राध्यक्षांनी प्राथमिकतेवर निवडलेल्या विज्ञान-तंत्रज्ञान, नूतनीकरण, व्यापार, पायाभूत सेवा, हवामान बदल जागतिक आरोग्य या विषयांना आमची संमती आहे. जागतिक आर्थिक वृद्धी यावर्षी जरी स्थिर वाटत असली तरी वर्ष 2020 मध्ये वृद्धी वाढण्याची अपेक्षा आहे तथापि वृद्धी नेहमीच अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर असते, यासाठी उभरता व्यापार, राजकारणातील तणाव, अस्थिरता, असमानता अंतर्भूत वृद्धि, व्यापारी वस्तूंच्या किंमती मध्ये होणारे बदल आणि कठोर आर्थिक अटी यांचा जोखिमेमध्ये समावेश आहे. जागतिक असंतुलन मोठ्या प्रमाणावर असून ते कायमस्वरूपी राहायला नको यासाठी त्यावर पूर्ण नियंत्रण आणि धोरण प्रतिसाद आवश्यक आहे. आम्ही यापुढे जागतिक आर्थिक पर्यावरणाला पोषक वातावरण मिळावे तसेच आंतरराष्ट्रीय व्यापाराला शाश्वत वृद्धी मिळण्याला महत्त्व देतो. या परिस्थितीत आम्ही असं निरीक्षण केले की, मागील दशकात, जागतिक वाढीचा पथदर्शक म्हणून ब्रिक्स राष्ट्रानी केलेले कार्य समाधानकारक असून, ब्रिक्स राष्ट्रे जागतिक स्तरावरील उत्पादनांच्या तिसऱ्या क्रमांकाचे प्रतिनिधित्व करतात.
- वर्ष 2030 दरम्यान जागतिक आर्थिक विकासाच्या अर्ध्याहून जास्त वृद्धिमध्ये ब्रिक्स राष्ट्रांतर्फे योगदान देण्यात येण्यार असल्याचे अनुमान आहे. पायाभूत सुविधांच्या निरंतर अंमलबजावणीमुळे आमची उत्पादन वाढीची क्षमता वाढेल तसेच ब्रिक्स राष्ट्रांच्या सदस्यांच्या संतुलित व्यापार विस्तारामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार स्त्रोत बळकट करण्यासाठी राष्ट्र सदस्यांकडून योगदान देण्यात येईल. राष्ट्र सदस्यांच्या आव्हानांना मदत करण्यासाठी आणि हाती असलेल्या संधींचा पुरेपूर लाभ घेता यावा यासाठी आम्ही त्याचे महत्त्व ओळखून इतरांना खुली बाजारपेठ ,सशक्त आर्थिक लवचिकता, आर्थिक स्थिरता, योग्यतेनुसार समृद्ध आर्थिक धोरणाची रचना आणि समन्वय, मानवी भागभांडवलात पुरेशी गुंतवणुक, दारिद्र्य आणि असमानता यात घट, नवीनतम विचारांसाठी परिणाम कार्यात स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणूक खुली सुदृढ व्यापार पर्यावरण, खाजगी सार्वजनिक प्रकल्पात सहकार्य देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत मापदंड तसेच शाश्वत आणि अंतर्भूत आर्थिक विकासासाठी इतरांचे योगदान घेण्यात येईल. आम्ही जागतिक मूल्य साखळीत विकसनशील देशांकडून मोठ्या प्रमाणात सहभागाची अपेक्षा करतो. आम्ही विकासात सांख्यिकीची भूमिकासुद्धा निश्चित करतो. आम्ही पारदर्शी भेदभावपूर्ण मुक्त आणि सर्वसमावेशक आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी वचनबद्ध आहोत संरक्षण एकपक्षीय वाद जागतिक आरोग्य संघटनेच्या भावना आणि नियमांच्या विरुद्ध आहेत. आम्ही बहुपक्षीय वाद आणि आंतरराष्ट्रीय व्यापार कायद्याच्या आमच्या वचनबध्दतेची पुष्टी करतो. आणि विश्वस्त व्यवस्था नियम आधारित बहुपक्षीय व्यापार प्रणालीला आमचे पूर्ण समर्थन देतो. संघटनेच्या आवश्यक सुधारणांसाठी तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापार आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि प्रासंगिक आणि परिणामकारकता वाढवू शकण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य, रचनात्मक रित्या कार्य करणार आहोत. या सुधारणा, जागतिक व्यापार संघटनेचे मध्यवर्ती मूलभूत मूल्य, मूलभूत तत्त्वांचे संरक्षण करणे यावर आधारित राहणे गरजेचे आहे. तसेच जागतिक व्यापार संघटनेचे वाढ वाटाघाटी धोरण हे संतुलित आणि चर्चात्मक तसेच खुले पारदर्शक आणि सर्वसमावेशक पद्धतीवर असणे आवश्यक आहे. जागतिक व्यापार संघटनेचा विभागात निपटारा यंत्रणा ही बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेचा एक अनिवार्य स्तंभ असून संस्थेचे योग्य आणि प्रभावी कार्य करण्यासाठी अंतर्गत समितीची यंत्रणा आवश्यक आहे.
- जागतिक व्यापार संघटनेच्या विवादांवर तोडगा काढण्यासाठी द्वी- स्तरीय निवाडा समिती कार्यरत असणे आवश्यक असून आम्ही ही पध्दत जतन करण्याची हमी देतो. जागतिक व्यापार संघटन तक्रार निवारणाची गरज बघून द्विस्तरीय निवाडा समितीच्या सदस्यांची निवड प्रक्रिया चालू करणे गरजेचे आहे.
- जागतिक वित्तीय सुरक्षेच्या नेटवर आम्ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी च्या सुरक्षतेसाठी एक मजबूत कोटा आधारित यंत्रणा कार्यरत ठेवण्यात आपल्या वचनबद्धतेची आम्ही पुष्टी करतो. तसेच 2010 मध्ये मान्य केलेल्या तत्त्वांच्या आधारावर आय. एम. एफ. कोटा आणि प्रशासकीय सुधारणांच्या अंमलबजावणीच्या कार्यकारी मंडळासह काम करण्याच्या आमच्या वचनबध्दतेची आम्ही पुनरावृत्ती करतो. पंधराव्या सार्वत्रिक राखीव जागा पाहणीची समाप्ती वर्ष 2019 च्या वार्षिक सभेपुवी करण्यास आम्ही वचनबध्द आहोत.
- पायाभूत सुविधा वित्त आणि शाश्वत विकासामध्ये ‘नवीन विकास बँक अर्थात एनडीबी’) ची भूमिका आणि प्रकल्पांचा एक मजबूत संतुलित आणि उच्च दर्जाचा आराखडा बनवण्याची गरज आम्ही लक्षात घेतो सदस्य देशांमध्ये महत्त्वपूर्ण आधारभूत गुंतवणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि आवश्यक कार्यावर आम्ही जोर देतो.
- एनडीबी अर्थात नवीन विकास बँक बळकट करण्यासाठी विविध विभागीय कार्यालयाची स्थापना करण्यात येणार आहे. चीन रशिया आणि दक्षिण आफ्रिका या देशामध्ये चालू होणाऱ्या प्रतिभूती कार्यक्रमांमध्ये स्थानिक चलनातील सर्व सदस्यांद्वारे संसाधने एकत्रित करण्याच्या एन.बी एन.च्या वचनबध्दतेचे स्वागत करतो. एनडीबी प्रकल्प निर्माण निधी त्वरित अंमलबजावणीसाठी आणि हा निधी परिणामकारकरित्या प्रकल्प निर्मितीसाठी वापरण्यात येईल अशी अपेक्षा करतो तसेच एनडीबी सदस्य देशांना तंत्रज्ञान सहाय्य पुरवण्याची तरतूद करण्यात येत आहे.
- आम्ही सदस्य देशांवर असलेल्या लघु मुदतीच्या देयतांच्या ताणाचा विचार करून " ब्रिक्स चालू राखीव व्यवस्था" अर्थात सी आर ए यांची यंत्रणा निरंतर ठेवण्यावर जोर देतो.
- वर्ष 2018 मध्ये घेतलेल्या यशस्वी चाचणीनंतर, स्त्रोतांच्या उपलब्धतेसाठी त्वरित कृती प्रतिसादासाठी जर गरज पडल्यास आम्ही जटिल चाचणी घेण्यास वचनबद्ध आहोत. स्थुल आर्थिक माहिती अर्थात मायक्रो इकॉनोमिक इन्फॉर्मेशन च्या आदान-प्रदानाची सी आर ए पद्धत कार्यरत करण्याचे स्वागत करतो तसेच आम्ही ब्रिक्स चलन प्रतिभूती निधी स्थापन करण्याच्या प्रयत्नांचे स्वागत करतो तसेच आम्ही सी आर ए आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्यातल्या सहकाऱ्याला पाठिंबा देत आहोत.
- आम्ही ब्रिक्स देशांच्या विरुद्ध झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो तसेच अशा प्रकारच्या कृतींना कुठलाही थारा दिला जाणार नाही यासाठी समर्थन करतो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या कायदेशीर आधारांवर आणि संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावांतर्गत समाजात दहशतवादाचा सामना करण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन अवलंब व्हावा यासाठी एकत्रित प्रयत्न आम्ही करतो.आम्ही पुन्हा सांगतो की दहशतवादी नेटवर्कला वित्तपुरवठा आणि विविध प्रदेशांवरील दहशतवादी कारवाया रोखण्याची सर्व राष्ष्ट्रांची जबाबदारी आहे. आम्ही सर्व तंत्रज्ञान कंपन्यांना विनंती करतो की, कायद्याच्या चौकटीत राहून दहशतवादाचा सामना करणे आणि दहशतवादाच्या निर्मूलनसाठी त्यांनी सरकारी यंत्रणेला सहकार्य करावे तसेच आयसीटीचा उपयोग सुरक्षा,भरती, सुविधा देण्यास दहशतवादी कारवायांचा नायनाट करण्यास करावा.
- भ्रष्टाचारविरोधी लढा तसेच खाजगी सार्वजनिक कंपन्याच्या अखंडतेसाठीही आम्ही वचनबद्ध आहोत. कायद्याची चौकट बळकट करणे आणि संपत्ती पुनरवसुली प्रयत्नांना आम्ही प्रोत्साहन देतो. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या खबऱ्याच्या सुरक्षेच्या मापदंडात सुधारणा करण्याची गरज आहे हे आम्ही ओळखले आहे आम्ही कबूल करतो की भ्रष्टाचार यामध्ये अवैध चलन आणि वित्तीय स्त्रोत तसेच बेकादेशीर संपत्ती जी विदेशामध्ये बचत करण्यात आली आहे , हे एक जागतिक आव्हान आहे जे अर्थव्यवस्थेच्या वृद्धीवर तसेच शाश्वत विकासावर नकारात्मक परिणाम करू शकते. यावर आळा घालण्यासाठी जागतिक सशक्तिकरणाला प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत
- भ्रष्टाचारविरोधी कृती साठी देशांतर्गत नियमन पद्धत तसेचविदेशात पळून गेलेले वित्तीय गुन्हेगार आणि यांच्यातर्फे संपत्तीची पुनर वसुली ही आमची नैतिक जबाबदारी आहे हे आम्ही ओळखले आहे. जागतिक सीमा संघटन आणि इतर बहुविध संबंधित यंत्रणा तसेच वित्तीय कृती कार्य दल सहकार्याचा यामध्ये अंतर्भाव आहे.
- स्वच्छता लवचिक ऊर्जा कार्यक्षम पद्धती, वृद्धी आणि ऊर्जा सुरक्षा त्याचा विचार करताना ग्रीन हाऊस उत्सर्जना साठीच सहकार्य किती कठीण आहे हे आम्ही ओळखले आहे. प्रगत तंत्रज्ञान आणि विविध ऊर्जा स्त्रोत यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सहकार्य करून ब्रिक राष्ट्रांसाठी प्रयत्नपूर्वक प्रोत्साहन देणे याची गरज आम्ही ओळखली आहे ब्रिक्स एनर्जी रिसर्च कॉर्पोरेशन प्लॅटफॉर्म अर्थात ब्रिक्स ऊर्जा संशोधन सहकार्य व्यासपीठ बळकट करावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तसेच शाश्वत ऊर्जा आणि प्रगत ऊर्जा तंत्रज्ञानाचा आदान प्रदान यावरील संयुक्तअभ्यासक्रम सुविधा देण्याचे ध्येय आम्ही ठरवले आहे.
- यु एफ सी सी च्या तत्त्वांतर्गत पॅरिस कराराची संपूर्णतः अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही बांधील आहोत तसेच यामध्ये एकत्रित तत्व आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असल्या तरी स्वतःच्या क्षमता ओळखून आणि विविध राष्ट्रांच्या भौगोलिक परिस्थितीजन्य समस्या लक्षात घेऊन आम्ही परीस कराराच्या अंमलबजावणीस बांधील आहोत. आम्ही विकसित देशांना वित्तीय , तांत्रिक, क्षमता बांधणी आणि कौशल्य विकासासाठी विकसनशील देशांना त्यांच्या क्षमता ओळखून त्या आत्मसात करण्यासाठी पाठिंबा देण्यासंदर्भात विनंती करू. सकारात्मक निर्णयाभिमुखतेसाठी या वर्षीच्या सप्टेंबर मध्ये "संयुक्त राष्ट्र संघ हवामान कृती परिषद" भरविण्यात येणार आहे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- वर्ष 2030 च्या शाश्वत विकासाचे उद्दिष्ट संदर्भात पुनर स्मरण करून देताना आम्हीसुद्धा शाश्वत विकासासाठी कटिबद्ध असल्याचे दृढतेने सांगतो. कार्यालयीन विकास सहाय्य संदर्भातील आमचे आश्वासनांनाचे महत्त्व आम्ही जाणतो तसेच विकासात्मक स्त्रोतांची स्त्रोतांचे तरतूद करण्यासाठी आम्ही आधीच अब्बा कृती धोरण राबवण्याचा निर्णयाला पाठिंबा देतो . आमचा वर्ष 2030 धोरणाच्या जी- 20 कृती धोरणाला पाठिंबा असुन आफ्रिकेमध्ये औद्योगीकरणाला G -20 देश प्राधान्य देणार असून अविकसित देश आणि जी-20 आफ्रिका भागीदारीत कार्य करतील.
- ग्रामीण आणि सदुर क्षेत्रातील लोकसंख्येला उभरते तंत्रज्ञान आणि डिजिटायझेशनचा लाभ जास्तीत जास्त मिळण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आम्हाला हे कळून चुकले आहे की नूतनीकरण हीच विकासाची किल्ली असून 2019 ब्रिक्स परिषदेसाठी "आर्थिक वृद्धी" संकल्पना ठरविल्या बद्दल आम्ही ब्राझीलचे कौतुक करतो. औद्योगिक क्षेत्रात डिजिटायझेशन परावर्तित हो्ण्या साठी तसेच इंटरनेट द्वारा दारिद्र्य निर्मूलन ड्राईव्ह चालवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त प्रयत्नांना आम्ही प्रोत्साहन देतो. नवीन औद्योगिक क्रांती ब्रिक्स नेटवर्क ब्रिक्स भविष्यातील नेटवर्कसाठी ब्रिक संस्था आणि तरुण शास्त्रज्ञ कृती दल यावर ब्रिक्स भागीदारीमध्ये आमचा समावेश राहील.
- सरतेशेवटी, ब्राझिलियन ब्रिक्स अध्यक्षपद 2019 च्या योग्य नियोजनासाठी आणि येत्या नोव्हेंबरमध्ये ब्राझीलिया येथे भरविण्यात येणाऱ्या अकराव्या ब्रिक्स परिषदेच्या यशस्वीतेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
B.Gokhale/D.Rane
(Release ID: 1576796)
|