उपराष्ट्रपती कार्यालय
सर्व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे आणि इंटरमिडीएट मंडळांना सूचनावली जारी करण्याबाबत मनुष्यबळ विकास मंत्रालयाने विचार करण्याची उपराष्ट्रपतींची सूचना
Posted On:
02 JUL 2019 9:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जुलै 2019
केंद्रीय विद्यापीठांमध्ये सुलभ प्रवेशासाठी श्रेणीबरोबरच गुणही देण्याबाबत सर्व उच्च माध्यमिक शिक्षण अथवा इंटरमिडीएट मंडळांना सूचनावली जारी करण्याबाबत विचार करावा अशी सूचना उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ रमेश पोखरीयाल निशंक यांना केली आहे.
जी मंडळे श्रेणी मधे निकाल देतात त्यांनी श्रेणीबरोबरच गुणही द्यावेत म्हणजे संबंधित विद्यापीठ त्या विद्यार्थ्याच्या गुणांची टक्केवारी काढू शकेल असे त्यांनी सांगितले. दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेताना आलेल्या समस्येबद्दल आंध्रप्रदेशच्या विद्यार्थ्यांनी उपराष्ट्रपतींची भेट घेतली त्यानंतर त्यांनी मनुष्य बळ विकास मंत्र्यांना आपल्या राज्यसभा दालन कक्षात बोलवून या मुद्यावर चर्चा केली.
आंध्रप्रदेशमधल्या इंटरमिडीएट शिक्षण मंडळाने 2017- 18 या शैक्षणिक वर्षासाठी प्रथम वर्षासाठी श्रेणी पद्धत लागू केली,2018-19 पासून दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यानाही हीच पद्धत सुरु ठेवली. मात्र दिल्ली विद्यापीठात गुणाच्या टक्केवारीवर प्रवेश असल्याने या विद्यार्थ्यांनी ही बाब उपराष्ट्रपती यांच्याकडे उपस्थित करून त्यांनी यातलक्ष घालण्याची विनंती केली होती. दिल्ली विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या चिंतेची दखल घेण्याचे निर्देश त्यांनी दिल्ली विद्यापीठ प्रशासनाला दिले होते. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाने हा मुद्दा संबंधित अधिकाऱ्यांकडे उपस्थित केला.
B.Gokhale/N.Chitale/D.Rane
(Release ID: 1576739)
Visitor Counter : 64