पंतप्रधान कार्यालय

लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि. 25 जून,19 रोजी केलेले भाष्य

Posted On: 25 JUN 2019 6:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 25 जून 2019

 

माननीय अध्यक्ष जी17 व्या लोकसभेच्या स्थापनेनंतर राष्ट्रपती महोदयांनी केलेल्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाचे समर्थन करण्यासाठीधन्यवाद देण्यासाठी मी उपस्थित झालो आहे.

राष्ट्रपतीजींनी आपल्या भाषणामध्येआपण भारताला कुठे घेवून जावू इच्छित आहोतकसे घेवून जावू इच्छित आहोतभारतामधल्या जनसामान्यांच्या आशा-आकांक्षांच्या पूर्तीसाठी कोणत्या गोष्टींना प्राधान्य देण्याची आवश्यकता आहेकोणत्या गोष्टींवर भर देण्याची गरज आहे- त्याचा एक आराखडाखाका तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रपतींजींचे भाषण म्हणजे देशातल्या सामान्य जनतेने आपल्याला कोणत्या आशा-आकांक्षा बरोबर घेवून या सभागृहामध्ये पाठवलं आहेत्याचा एक प्रकारे प्रतिध्वनी आहेआणि म्हणूनच या भाषणासाठी धन्यवाद देणे म्हणजे एका अर्थी देशाच्या कोटी-कोटी जनतेलाही धन्यवाद दिल्यासारखे आहेत.

एक सशक्तसुरक्षितसमृद्धसर्वसमावेशक असे राष्ट्र बनवण्याचे स्वप्न आपल्या देशाच्या अनेक महापुरुषांनी पाहिले आहे. त्या स्वप्नपूर्तीसाठी संकल्पबद्ध होवून अधिक वेगानेअधिक तीव्रतेने आपण सर्वजण मिळून कार्य करीत पुढे जायचे आहे. ही आजच्या काळाची मागणी आहे. देशाच्या अपेक्षा आहेत आणि आजच्या वैश्विक वातावरणामध्ये अशी संधी भारताने गमावता कामा नये.

या भावनेनं आपण सर्वजण पुढं जायचं आहे. आपण सर्वजण मिळून पुढची वाटचाल करूया. देशाच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भविष्यात येणारी सर्व आव्हाने पेलूनसर्व समस्यांवर आपण मात करू शकतोअसे मला वाटते

या चर्चेमध्ये जवळपास 60 आदरणीय खासदारांनी भाग घेतला. जे पहिल्यांदाच या सभागृहाचे सदस्य बनले आहेतत्यांनी आपलं मत अतिशय चांगल्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला. चर्चा सार्थक बनवण्याचा प्रयत्न केला. जे अनुभवी आहेतत्यांनीही आपआपल्या पद्धतीने या चर्चेला पुढे नेले.

श्रीमान अधीर रंजन चैधरीजीश्री. टी. आर. बालूजीश्री. दयानिधी मारन जीश्रीमान सौगत राय जीजयदेव जीसुश्री महुआ मोइत्रापी.व्ही. मिधून रेड्डी जीविनायक राऊतराजीव रंजन सिंह जीपिनाकी मिश्राश्री. नामा नागेश्वर रावमोहम्मद आज़म खानअसुदुद्दीन ओवैसीश्री. प्रतापचंद्र षडंगीडॉक्टर हिना गावित यांच्यासह इतर सर्वांनी या चर्चेला सार्थक बनवलंयाबद्दल मी सर्वांचे हृदयापासून खूप-खूप आभार व्यक्त करतो.

आपण सगळेजण मनुष्य आहोतआणि माणसाच्या बाबतीत जी गोष्ट म्हटली जाते ती  अगदी खरी आहेअसं दिसून येत आहे. 30 दिवसामध्ये ज्या गोष्टींचा मनावर ठसा उमटतोज्याचा प्रभाव पडतोती गोष्ट नंतर काढून टाकणे जरा अवघड जात असतं असं माणसाच्याबाबतीत म्हणतात आणि याच कारणामुळे निवडणुकीच्या भाषणांचा थोडा-फार परिणाम दृष्टीस पडत होता. परंतु कदाचित निसर्गाचा नियम असावाम्हणूनच.... आता पहा मी सुद्धा आपल्याला हे बोलतोय... या वलयांकित पदावर आरूढ होवून आपण या सभागृहाचे संचालन केलेसंपूर्ण चर्चेच्या वेळी सर्वांना विश्वासात घेवून ती पुढं कशी जाईलयाचा विचार केला. आपल्यासाठी हे पद नवीन आहे. आणि ज्यावेळी आपण नवखे असतोत्यावेळी काही लोकांच्या मनात वेगळ्याच गोष्टीही येत असतात.  अगदी प्रारंभीच आपल्यासमोर अडचणी निर्माण करण्याचे विचार काहीजणांच्या मनात येत असतात.

सर्व परिस्थिती जाणूनही आपण सगळं काही अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज हाताळलंयासाठी मी आपल्याला खूप- खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर नवीन अध्यक्ष महोदयांना सर्व सदस्यांनी केलेल्या सहकार्याबद्दलसर्वांचे आभार व्यक्त करतो.

माननीय अध्यक्ष जीअनेक दशकांच्यानंतर देशाने चांगले स्पष्ट बहुमताचे सरकार निवडले आहे. एकाच सरकारला दुस-यांदा निवडून दिले आहे. त्याचबरोबर पहिल्या सरकारपेक्षा अधिक शक्तिशाली सरकारच्या हाती सत्ता सोपवली आहे. आजच्या या वातावरणामध्ये भारतासारख्या ‘व्हायब्रंट लोकशाहीमध्ये प्रत्येक भारतीयासाठी एक गौरवाचा विषय आहेतो म्हणजे आमचा मतदार किती जागरूक आहेतो स्वतःपेक्षा आपल्या देशावर जास्त प्रेम करतोस्वतःपेक्षा आपल्या देशासाठी काय चांगलं आहेयाचा कसा निर्णय घेतोहे या निवडणुकीमध्ये अगदी स्पष्टपणे दिसून आले आहे. आणि म्हणूनच देशाचा मतदार अनेकानेक अभिनंदनास  पात्र आहे.

मला आणखी एका गोष्टीचा आनंद आहे. अर्थात आमच्या संपूर्ण टीमला हा आनंद आहे. 2014मध्ये आम्ही एकदम नवखे होतो. देशाच्या दृष्टीनेही आम्ही अपरिचित होतो. आम्हाला देश ओळखत नव्हता. परंतु त्यावेळच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि देशाने एक नवीन प्रयोग करून पाहण्याचे ठरवले. कोणीही असू देपण नवीन सरकार येवू देत्यावेळच्या सरकारपासून सुटका करणंबचाव करणं महत्वाचं आहेअसा विचार करून आम्हाला संधी देण्यात आली होती. परंतु 2019चा जनादेश म्हणजे आम्ही अगदी सगळ्या कसोट्या पार केल्यानंतरप्रत्येक तराजूमध्ये तोलून झाल्यानंतरही जनता-जनार्दनाने आम्हाला अगदी बारिक नजेरने तपासलं आहे. पारखलं आहेकाळजीपूर्वकविचारपूर्वक पुन्हा एकदा सत्तेचा सोपान आमच्या हाती सोपवला आहे. लोकशाहीची हीच सर्वात मोठी ताकद आहे. मग तो जिंकणारा असो अथवा हरणारा असोमग तो मैदानात असो अथवा मैदानाबाहेरप्रत्येकासाठी हा विजय म्हणजे आगामी पाच वर्ष कठोर परिश्रम करण्यासाठी मिळाला आहे. सरकारला या पाच वर्षात  जनता- जर्नादनाला सुखसुविधा पुरवण्यासाठी समर्पित करावी लागणार आहेत. अगदी पूर्ण रूपानं ‘सर्वजन हितायसर्वजन सुखाय’ हे धोरण लागू करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करायचा आहे. लोकांनी आता पुन्हा एकदा आपले अनुमोदन देवून देश सेवा करण्यासाठी दुस-यांदा सत्ता दिली आहे.

माननीय अध्यक्ष जीज्यावेळी जनता-जनार्दनही ईश्वराचं स्वरूप मानली जाते. जी जनताच ज्यावेळी आपल्या कामाला अनुमोदन देतेत्यामुळे झालेल्या आनंदाची इतर कोणत्याही आनंदाशी तुलना करता येत नाही. हा काही फक्त निवडणुकीतला विजय नाही. आणि यश-अपयशाचे आकडे यांचा खेळही नाही. तर हा आयुष्यातल्या त्या आस्थेचा खेळ आहे. ज्याठिकाणी ‘कमिटमेंट’ म्हणजे काय असतं, ‘डेडीकेशन’  म्हणजे काय असतंजनता-जनार्दनासाठी जगणं म्हणजे काय असतंत्यांच्यासाठी लढणंजनता-जनार्दनासाठी खपणंम्हणजे काय असतंत्याचे फळ मिळत असतं. पाच वर्षांच्या अखंडएकनिष्ठअविरततपस्येचे जे फळ मिळते ते पाहून त्यामुळं मिळालेला आनंद हा एका वेगळ्याच अध्यात्माची अनुभूती देतो. आणि म्हणूनच कोण हरलं आणि कोण जिंकलंया परिघामध्ये निवडणुकीला बंदिस्त करून टाकणंमाझ्या विचारांचा भाग असू शकत नाही. मी या सर्वांच्या पलिकडंपुढं जावून विचार करतो. आणि म्हणूनच  माझं लक्ष 130 कोटी देशवासियांवर असतं. त्यांची स्वप्नंत्यांच्या आशा-आकांक्षा यांच्यावर माझी कायम नजर असते.

माननीय अध्यक्ष जी2014 मध्ये ज्यावेळी देशाच्या जनतेने संधी दिलीत्यावेळी मला पहिल्यांदाच मध्यवर्ती सभागृहामध्ये भाषण करण्याची संधी मिळाली होती. आणि त्यावेळी मी अगदी सहजपणे म्हणालो होतो कीमाझं सरकार हे गरीबांना समर्पित आहे. आज त्या पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या नंतर अतिशय आनंदानं मी हेच म्हणू शकतो. आणि जनता जनार्दनानेही ‘ईव्हीएमचं बटन दाबून आपली भावनेची अभिव्यक्ती दाखवली आहे. ज्यावेळी चर्चेला प्रारंभ झाला त्यावेळी पहिल्यांदाच या सभागृहामध्ये आलेले श्रीमान प्रताप षडंगी जी यांनी आणि आदिवासी समाजातून आलेली माझी भगिनी डॉक्टर हिना गावित जी यांनी ज्या प्रकारे विषय मांडलाज्या पद्धतीने अगदी बारकाईने सर्व गोष्टी मांडल्याते ऐकून मला वाटतंआता यानंतर मी काहीही बोललो नाही तरी जे काही सांगायचं आहेते सर्व काही सर्वांपर्यंत पोहोचले आहे.

माननीय अध्यक्ष जीआपल्या देशामध्ये जितके महापुरूष झालेसार्वजनिक जीवनामध्ये ज्यांनी मार्गदर्शन केलेत्यांनी एक गोष्ट नेहमीच सांगितली आहेती म्हणजेअंत्योदयाची गोष्ट आहे. समाजातल्या सर्वात शेवटच्या घटकाचंत्या शेवटच्या माणसाचं भलंकल्याण झालं पाहिजेअसंच सर्वांनी नमूद केलं आहे. मग ते पूज्य बापू असो अथवा बाबासाहेब आंबेडकर असोकिंवा लोहियाजी असोदीनदयाळजी असो- प्रत्येकानं हीच गोष्ट केली आहे. गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळामध्ये आमच्या मनामध्येही हाच भाव कायम राहिला आहे. ज्याचं कोणीही नाहीत्याच्यासाठी केवळ सरकार आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही जाणते-अजाणतेपणाने एक अशी संस्कृती स्वीकार केलीअशा संस्कृतीला प्रोत्साहन दिलंवाढीस लावलं , जोपासलंत्याचा परिणाम म्हणजे या देशातल्या जनसामान्य जनतेला आपल्या हक्काच्या व्यवस्थेसाठी लढावं लागलंखूप यातायात करावी लागलीत्यांना चांगल्या व्यवस्थेसाठी महत्प्रयास करावे लागले. इथं मी कोणावरही आरोप करत नाही. ज्या सामान्य मानवी हक्काच्या गोष्टी आहेतत्या सहजगत्या मिळण्याचा त्यांचा अधिकार होतापरंतु त्या मिळवण्यासाठी त्यांना लढावं लागलं. मला सांगा त्यांना त्यांचे अधिकार मिळायला हवे होते की नाहीआणि मिळाले असतील किंवा नसतीलत्यांनी तक्रार केली असेल अथवा नसेल- हे असंच चालायचंचालू रहाणारअसं आपण समजून चाललो होतो.

या गोष्टी बदलण्यासाठी किती परिश्रम करावे लागतातहे मी जाणून आहे. राज्यांनाही ‘ऑन बोर्ड’ आणण्यासाठी किती त्रास होतो. आणि 70 वर्षांच्या या आजारावर अवघ्या पाच वर्षांत औषधोपचार करणं  खूप अवघड आहे. परंतु मी आता आनंदानं म्हणू शकतो कीआम्ही ज्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे- अतिशय संकटे असूनहीमार्ग अवघड असतानाही आम्ही ती दिशा काही सोडली नाही. तसेच आम्ही ‘डायव्हर्ट’ झालो नाही की ‘डायल्यूट’ झालो नाही. आम्ही ज्या उद्देशाने वाटचाल सुरू केली आहे त्यानुसार कार्य होत आहे. आणि हा देश दूध आणि पाणी यांच्यातला फरक अगदी नेमकेपणानं ओळखू शकतो. देशवासियांनी शौचालय म्हणजे केवळ चार भिंती असं मानलं नाही. घरामध्ये स्वयंपाकाचा गॅस पोहोचला म्हणून भोजन व्यवस्थित बनवलं जातंय,  इतकंच आहेअसंही मानलं नाही. तर प्रत्येक व्यवस्थेमागे काहीतरी हेतूउद्देश आहेहेही समजून घेतलं. अखेर इतकं सगळं सरकार का करत आहेहे जाणून घेतलं. मी तर स्वयंपाकासाठी गॅस मागितला नव्हतामी तर वीजेचं कनेक्शन मागितलं नव्हतं विजेशिवायच मी पूर्ण आयुष्य जगलोते हे का करताहेतआधी प्रश्न केला जात होताहे कोणी का करत नाहीआज त्यांच्या मनामध्ये एक विश्वास निर्माण झाला की हे सगळं का करताहेतका करत नाहीत इथंपासून सुरू झालेला का करताहेत पर्यंतचा प्रवास खूप लांबवरचा होता. परंतु आता यामध्ये विश्वास आहे. या विश्वासामुळेच आपलेपणा निर्माण झाला आहे. ही भावनाच आज देशामध्ये एका नवीन सामर्थ्याची जाणीव करणारी ठरत आहे. आता या विश्वासालाआपलेपणाच्या भावनेला असेच पुढे नेण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहेया दिशेने आम्ही मार्गक्रमण करत आहोत.

देश एक ‘वेलफेअर स्टेट’ म्हणून गरीबीशी झुंज देतोयही गोष्ट बरोबर असल्यामुळंतितक्या योजनांनुसार ‘ईज ऑफ लिव्हिंगसाठी सामान्य माणसाला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहेत्यांची पूर्तता केली पाहिजे. त्याचबरोबर देश पुढंही गेला पाहिजे. गरीबांचं कल्याण व्हावंगरीबांचं उत्थान व्हावंगरीब सक्षम झाले पाहिजेतत्याच बरोबर आधुनिक भारतही सशक्तपणानं पुढं गेला पाहिजे. म्हणूनच एका बाजूला ‘वेलफेअर’ म्हणजेच कल्याणाच्या योजनांवर लक्ष केंद्रीत केले गेले पाहिजे आणि त्याच जोडीला जनसामान्यांच्या आवश्यक गरजांच्या पूर्तीसाठी भरपूर प्रयत्न केले पाहिजेत. अशा पद्धतीने दोन समानांतर मार्गांवर कार्यरत राहण्याची गरज आहे. दुसरीकडे आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती करून देशाला आधुनिक बनवण्याची योजना लागू करण्याचं काम आहे.

आम्ही या दोन्ही कामांवर भर दिला आहे. ‘हायवेजअसो अथवा ‘आय-वेज’ असो त्याचबरोबर ‘वॉटरवेज’ असोलोहमार्ग असोरस्तेमार्ग असो, ‘उडान’ योजनेतून हवाई मार्गांची व्यवस्था असोस्टार्टअप असोनवसंकल्पना असोटिंकरिंग लॅब पासून ते चंद्रयानापर्यंतच्या प्रवासाची कल्पना असो- या सगळ्या गोष्टींमुळं एका आधुनिक भारताची निर्मिती होणार आहे. त्याचबरोबर हे करण्यासाठी येणा-या प्रत्येक आव्हानांना तोंड देत आपल्याला पुढं जायचं आहे.

इथं खूप चांगल्या गोष्टी सांगण्यात आल्या. काही गोष्टी अगदी तिखटही होत्या. जास्त म्हणजे निवडणुकीच्या प्रचारसभांप्रमाणे गोष्टी करण्यात आल्या. प्रत्येकाची आपआपली एक कार्यक्रम पत्रिका असतेत्याविषयी मला काही बोलण्याची गरजही नाही. परंतु इथं सांगण्यात आलं कीआमची उंची कोणी कमी करू शकणार नाही. अशी चूक आम्ही करू शकत नाही. आम्ही कोणा एकानं ओढलेली रेष लहान करण्यामध्ये आमचा वेळ वाया घालवणार नाही. आम्ही आमची रेषा मोठी करण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घालतोय.

आणि आपली उंची आपल्याला लखलाभ ठरो. कारण आपण आता इतक्या उंचीवर पोहोचलेले आहातइतके उंच गेलेले आहात कीआता तिथून जमीन दिसणं बंद झालं आहे. आपण आता मूळापासून उखडले जावून खूप उंचावर जावून पोहोचले आहात. आपण इतके उंच गेले आहात कीजे जमिनीवर आहेतते आपल्यालेखी तुच्छ आहेत. आणि म्हणूनच आपण इतकी मोठी उंची गाठणंमाझ्यासाठी अतिशय आनंददायी आहे.... आणि माझी इच्छा आहे कीआपण अशाच पद्धतीने आणखी जास्त उंची गाठावी. आपली आणि आमची उंचीच्याबाबतीत कोणत्याही प्रकारे स्पर्धा होवू शकत नाही. कारण आमचं स्वप्न काही उंच होण्याचं अजिबात नाही- आमचं स्वप्न मुळांशी जोडले जाण्याचं आहे.

आमची मुळं अधिकाधिक खोलवर कशी रूजतील हे पाहण्याचं आमचं स्वप्नं आहे. आमचं स्वप्नं मुळांना अधिकाधिक ताकदवान बनवण्याचं आहे आणि देशाला बळकटी देण्याचा आमचा मार्ग आहे. आणि म्हणूनच ज्या स्पर्धेमध्ये आम्ही सहभागी होणारच नाहीत्या स्पर्धेसाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छाच देत राहणार. अजून खूप उंच तुम्ही व्हावंअधिकाधिक उंची तुम्ही गाठावीआणखी उंचावर पोहोचावंअशा आमच्या मनापासून सदिच्छा आहेत. माझ्या नजरेस आलं आहे कीअनेकदा काही विषयांवर पुन्हा-पुन्हा चर्चा केली जाते. काही लोकांना काही विशिष्ट लोकांविषयी विशेष जवळिकता असतेही गोष्ट खरी आहे. जर का चर्चेत त्यांचं नाव आलं नाही तर ही मंडळी अगदी त्रासून जातात. नाव नाही घेतलं तरी अपमान केला गेलाअसं वाटायला लागतंवास्तविक असं काही व्हायला नकोयपरंतु होतं हेही खरं आहे.

सन 2004च्या आधी देशामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार होतं. 2004 ते 2014 या काळामध्ये शासनामध्ये असलेल्या लोकांनी अधिकृत कार्यक्रमामध्ये एकदा सुद्धा अगदी एकदाही अटलजींच्या सरकारचं कौतुक केलं असेलत्यांनी केलेल्या चांगल्या कामाचा साधा उल्लेख केला असेलतर त्याची माहिती पटलावर ठेवण्यात यावी. इतकंच नाहीअटलजींची गोष्ट आपण एकवेळ सोडून देवूनरसिंह राव यांच्या सरकारचं कौतुक केलं असेलते पटलावर ठेवावं. इतकंच नाही तर आत्ताच्या भाषणामध्ये यांनी डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या नावाचा एकदा तरी उल्लेख केला का हे मला सांगावं. आणि या मोठ-मोठ्या लोकांच्या तुलनेत माझी बरोबरी काहीच नाही. मी तर एक सामान्य व्यक्ती आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आत्तापर्यंत या देशात केंद्रामध्ये आणि राज्यांमध्ये आलेल्या सर्व सरकारांनी या देशाला पुढं घेवून जाण्याच्या कार्यात योगदान दिलं आहेअसं परंतु मी लाल किल्ल्यावरून  एकदा नाही तर दोनवेळा जाहीर बोललो आहे. देशात आत्तापर्यंत सरकार चालवणा-या केंद्र आणि राज्य सरकारचं असं दोनवेळा जाहीर कौतुक करणारा मी कदाचित पहिलाच पंतप्रधान असेन.

या सभागृहामध्येही मी अनेकदा सांगितलं आहेआज पुन्हा एकदा सांगतोय. आम्ही काही ‘तसे’ लोक नाहीत. आणि म्हणूनच पुन्हा- पुन्हा सांगून कोणाच्या अपेक्षांसाठी ठराविक नाव घ्यायचं...ही गोष्ट वेगळी आहे. तरीही मी एक उदाहरण देतो- आम्हा लोकांच व्यक्तित्व नेमकं कसं आहेआमचं चरित्र कसं आहेआम्ही कसा विचार करतो याची सगळी माहिती या उदाहरणामुळे तुम्हाला मिळेल. त्यामुळं आमच्याविषयी समजणं तुम्हाला सोईचं ठरेल. अशी सुविधा सगळ्यांना मिळतेच असं नाही.

गुजरातमध्ये मुख्यमंत्री म्हणून दीर्घ काळ काम करण्याची मला संधी मिळाली. गुजरात राज्य स्थापनेला या काळातच पन्नास वर्ष पूर्ण झाली. म्हणजेच गुजरात राज्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष या काळातच होतं. या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आम्ही अनेक कार्यक्रम केले. सगळ्यांना बरोबर घेवून ते कार्यक्रम केले. परंतु या काळात केलेलं एक महत्वपूर्ण कार्य मी आज आपल्याला सांगू इच्छितो. मी सूचना दिली कीगेल्या 50 वर्षांमध्ये ज्या ज्या राज्यपाल महोदयांची भाषणे झाली आहेतत्या सर्व भाषणांचे संकलन करून त्याचा एक ग्रंथ प्रकाशित केला जावा.  हा ग्रंथ म्हणजे गुजरातच्या इतिहासाच्या नोंदींचा दस्तावेज तयार झाला पाहिजे. आता मला सांगागेल्या 50 वर्षातल्या राज्यपालांची भाषणे म्हणजे कोणाची भाषणे होती?

त्याकाळामध्ये सरकारवर स्तुतीसुमनं उधळणारी भाषणे होती किंवा तत्कालीन सरकारच्या कामाचा त्यामध्ये ताळेबंद मांडलेला होता. आमच्या पक्षाची तर त्यावेळी सरकारं नव्हतीच. परंतु हा आमच्या विचारांचा एक भाग आहे. शासन चालवणा-या व्यवस्थेमध्ये ज्यांचा ज्यांचा सहभाग आहेजो कोणी देशाला पुढं घेवून जाण्यासाठी काही भूमिका बजावत आहेत्याची ती घेतलेली दखल होती. आणि हे काम पूर्णपणे सकारात्मक हेतूनं केलं होतं. कोणत्याही वर्तमानपत्रातल्या संपादकीयाचे संकलन करून तो ग्रंथ छापण्यात आला नव्हता. राज्यपालांची भाषण छापणंकाही साधी गोष्ट नव्हती. मात्र आम्ही ती त्यावेळी केलीआजही हा ग्रंथ सर्वांना उपलब्ध आहेकोणीही पाहू शकेल.

आणि म्हणूनच माझं असं म्हणणं आहे कीया आधी आमच्या पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये जे काम झालं आहेत्याची गणती कोणी अजिबातच करत नाहीआणि आम्हालाच आपण काय केलं हे पुन्हा-पुन्हा ऐकवत राहतात. वास्तविक ज्यांनी कधी इतरांनी काम केल्याचा कधी स्वीकार केला नाहीत्यांना हे वारंवार ऐकवण्याचा काहीएक अधिकार नाही. नाहीतर देशाला वाटत होतं कीत्यांच्या काळखंडामध्ये नरसिंह राव यांना भारत रत्न मिळालं असतं. त्यांच्या काळामध्ये पहिल्या टर्मनंतर डॉक्टर मनमोहन सिंह जी यांना भारत रत्न दिले जाते.

परंतु एका विशिष्ट परिवाराबाहेरच्या व्यक्तींना कधीच काही मिळालेलं नाहीए. आम्ही असे आहोतआमची विचार पद्धती वेगळी आहे. आता प्रणव दा कोणत्या पक्षाचे होतेकोणत्या पक्षासाठी त्यांनी अवघं आयुष्य वेचलं. त्याच्या आधारावर काही आम्ही निर्णय घेतला नाही. त्यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचा विचार करून आम्ही त्यांना भारत रत्न देण्याचा निर्णय घेतला. असा निर्णय आम्ही घेवू शकतो. आणि म्हणूनच कृपा करून -माझ्या या बोलण्यानंतर मला चांगलं वाटत नाहीमला आनंद होत नाहीपरंतु पुन्हा-पुन्हा आम्हाला हे ऐकवण्याची गरज नाही. यापुढं पुन्हा हे ऐकून घेतलं जाणार नाही.

आज मी हे सगळं रेकॉर्डवर आणू इच्छितो कीकृपा करून असं वारंवार बोलू नये. आम्ही कोणाचंही योगदान कधीच नाकारत नाही. आणि ज्यावेळी मी सव्वाशे कोटी देशवासीय या देशाला पुढे घेवून जात आहेतअसं म्हणतोत्यावेळी या सव्वाशे कोटी नागरिकांमध्ये सगळेच जण येतात हो आणि म्हणूनच कृपा करून आपण चर्चेला इतकं छोटं बनवू नये.

माननीय अध्यक्ष जीकाल तर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये खूप मोठ मोठ्यांदा दिलेल्या घोषणा सर्वांना ऐकवल्या. ‘हे कोणी केलंते कोणी केलंअमुक कोणी केलंया घोषणा सर्वांनी ऐकल्या. आज 25 जून आहे साहेब! अनेक लोकांना  25 जून काय आहेयाची माहिती तरी आहे काआजू-बाजूला विचारावं लागतंय. ‘त्या’ 25 जूनच्या रात्री देशाचा आत्मा पायदळी तुडवला गेला होता. भारतामध्ये लोकशाही काही घटनेच्या पृष्ठांमधून निर्माण झाली नाहीतर भारतामध्ये अनेक युगांपासून लोकशाही आमचा आत्मा आहे. हा आत्माच पायदळी तुडवला  गेला  होता. देशातल्या प्रसार माध्यमाची मुस्कटदाबी करण्यात आली होती. देशातल्या महापुरुषांना कारागृहात डांबण्यात आलं होतं. संपूर्ण हिंदुस्तानला तुरूंगाचं स्वरूप दिलं गेलं होतं. आणि हे सगळं काही फक्त कुणाची सत्ता जावू नये यासाठी केलं गेलं होतं. न्यायपालिकेचा निवाडा होतान्यायसंस्थेचा अनादर कसा केला जातोयाचं जीवंत उदाहरण हे आहे.

आज 25 जूनला आपण लोकशाहीसाठी पुन्हा एकदा आपले समर्पणआपला संकल्पआणखी जास्त ताकदीनंक्षमतेनं समर्पित करण्याची आवश्यकता आहे. घटनेविषयी बोलणं आणि घटनेला पायदळी तुडवण्याचं पाप करणेया गोष्टी कोणीही विसरू शकणार नाही. आणि त्याकाळामध्ये जे-जे कोणी या पाप कर्मामध्ये भागीदार होतेत्यांच्यावर लागलेले हे डाग कधीच पुसले जाणार नाहीत. आणि या गोष्टींचं पुन्हा-पुन्हा स्मरण करण्याचीही गरज आहे. त्यामुळं देशामध्ये पुन्हा अशी स्थिती कधीच निर्माण होता कामा नये. . कोणालाही काही चांगलं-वाईट बोलण्यासाठी नाही तरकोणालाही या पापाच्या मार्गावरून जाण्याची इच्छा होवू नयेयासाठी या काळ्या रात्रीचे स्मरण ठेवणं जरूरीचं आहे.

लोकशाहीविषयी आस्था असणं महत्वाचं का आहेहे समजण्यासाठीही लोकशाहीवर कशाप्रकारे घाला घालण्यात आला होतायाचं स्मरण करण्याची गरज आहे. यामागे कोणालाही वाईट-साईट बोलण्याचा हेतू अजिबात नाही. ज्यावेळी प्रसार माध्यमावर बंदी घालण्यात आली होतीत्यावेळी रोज संध्याकाळी पोलिस येतील आणि पकडून नेतीलअसं वाटत होतं. अशा दहशतीच्या वातावरणामध्ये या माझ्या देशाने त्या काळात नागरिकांचं सामर्थ्य पहात्यांची ताकद पहाजातपंथसंप्रदाय या सर्वांपासून बाजूला राहून  त्यावेळच्या निवडणुकीत मतपेटीव्दारे देशाने आपले मत व्यक्त केले होते. आणि लोकशाहीसाठी मतदान केले होते.  जनतेने पुन्हा एकदा लोकशाही प्रस्थापित केली होती. ही माझ्या देशाच्या मतदारांची खरी ताकद आहे. यावेळी पुन्हा एकदा जातपंथसंप्रदायभाषा ही भिन्नता बाजूला सारून केवळ आणि केवळ देशाच्या उज्वल भविष्यासाठी देशाच्या सर्व मतदारांनी मतदान केलं आहे.

माननीय अध्यक्षजीराष्ट्रपती जीं नी आपल्या भाषणामध्ये दोन महत्वपूर्ण गोष्टींचा उल्लेख केला आहे. एक म्हणजे गांधी यांच्या 150 व्या जयंतीचा आणि दुसरा म्हणजे स्वातंत्र्याला  75 वर्ष पूर्ण होत आहेतत्याचा उल्लेख केला आहे. एखाद्या कुटुंबाचं जीवन असो अथवा समाज जीवन असोकाही दिवसतारखा या नवीन जोशउत्साहाची भावना निर्माण करीत असतात. जीवनाला ऊर्जावान बनवण्याची संधी या तारखांमुळे मिळत असते. संकल्पांच्या पूर्तीसाठी समर्पणाच्या भावनेने एकत्र होण्याची भावना यामुळे निर्माण होत असते. भारताच्या जीवनामध्येही आज आपल्याजवळ पूज्य बापू यांच्याशिवाय दुसरी कोणतीही मोठी प्रेरणा नाही. आज आपल्याजवळ स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण करणा-या वीरांच्या स्मरणगाथांपेक्षा इतर काहीही मोठे नाही. त्यामुळं आपण त्यांच्या स्मरणाची संधी गमावता कामा नये.

देशाच्या  स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घातलंत्यांचं पुण्य स्मरण करूनज्यांनी स्वातंत्र्यासाठी अनेक यातना भोगल्या आहेतज्यांनी आपलं तारूण्य माता भारतीसाठी समर्पित केलंत्यांचे पुण्य स्मरण करून आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी जन आंदोलनाचे यशस्वीपणे नेतृत्व करणा-या बापूंचे स्मरण करताना या तारखा म्हणजे एक संधी मानून देशामध्ये पुन्हा एकदा नव्यानं जोश निर्माण करता येऊ शकतो. आणि हा काही सरकारचा कार्यक्रम होवू शकत नाही. फक्त आणि फक्त देशाचा असेल. राष्ट्रपतीजीं हा विषय बोलले आहेत. आमच्यासाठी हा संकल्पाचा काळ आहे. निवडणुकीच्या मैदानामध्ये ‘तू-तूमी-मी’ असं जे काही करायचं आहेते जरूर करावं. परंतु ही एक संधी आहेती आपण सोडली नाही पाहिजे. स्वातंत्र्यापूर्वी देशासाठी मरण पत्करण्यासाठी मनाची सिद्धता होती. आज स्वातंत्र्याच्या 75व्‍या वर्धापनादिनाच्‍या वर्षामध्ये देशासाठी जगण्याची सिद्धता निर्माण करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे.

मी या सभागृहामध्ये सर्व लोकप्रतिनिधींना आग्रह करतो तसंच देशातल्या सार्वजनिक जीवनाचे नेतृत्व करणा-या सर्व लोकांना आग्रह करतो कीराष्ट्रपतीजींनी आपल्याला जो आदेश दिला आहेआपल्याकडून जी अपेक्षा व्यक्त केली आहेत्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी पुढं यावं. आणि या दोन्ही महत्वपूर्ण संधींचा उपयोग नवीन भारताच्या निर्माणासाठी करावा. जनसामान्यांशी जोडण्यासाठी आपण कशा पद्धतीनं पुढं येवू शकतोत्यासाठी प्रयत्न करावा.

हिंदुस्तानच्या गुलामीचा कालखंड खूप प्रदीर्घ होता. परंतु या गुलामीच्या काळामध्ये देशाच्या कानाकोप-यामध्ये कोणी ना कोणी स्वातंत्र्यासाठी आवाज उठवत राहिलेकधी कोणी आवाज उठवला नाहीअसं कधीच घडलं नाही. त्याग आणि बलिदानाची परंपरा सुरू राहिली नाहीअसंही कधी घडलं नाही. 1857 मध्ये एक संघटित समूह प्रकट झाला. परंतु महात्मा गांधीजींचं खूप मोठं योगदान होतं. त्यांनी देशातल्या जनसामान्यांना स्वातंत्र्याचे शिपाई बनवलं. जर एखादी व्यक्ती झाडण्याचं काम करत असेल तरी तो स्वातंत्र्यासाठी करत असेल. तो मुलांना शिकवत असेलतर ते कामही स्वातंत्र्यासाठी करत असेल. तो खादीचे वस्त्र वापरत असेल तरी तो स्वातंत्र्यासाठी वापरत असेल. 

हे सगळं काही बापूजींनी केलं. -संपूर्ण हिंदुस्तानामध्ये स्वातंत्र्यासाठी एका वातावरणाची निर्मिती केली. आणि 1942 मधल्या भारत छोडो आंदोलनामध्ये देशातला प्रत्येक नागरिक जोडला गेला. 1942  ते 1947 हा काळ खूप महत्वपूर्ण ठरला आणि स्वातंत्र्य संग्रामाच्या दृष्टीने एका महत्वाच्या वळणाचा टप्पा ठरला. आपण गांधीजींची 150 वी जयंती आणि स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापनदिन 1942 च्या जोशात देशाला संकटांपासून मुक्ती देण्यासाठीदेशाला समस्यांमधून मुक्त करण्यासाठीअधिकारांपासून वेगळे होवून कर्तव्यावर भर देवूनजबाबदारींचं पालन करण्यासाठी देशाला प्रेरणा देण्यासाठी साजरा करू शकतो कायासाठी आपण सर्वजण पुढं येवू शकणार का?

मला वाटतंराष्ट्रपतीजींनी हा विषय अतिशय महत्वपूर्ण पद्धतीने आपल्यासमोर मांडला आहे. आणि लोकांना आश्चर्य होत असे कीज्यावेळी स्वातंत्र्याची मागणी होत होती. खिल्लीही उडवली जात होती. कसं काय सरकार चालवलं जाणारकोण चालवणारअसं चेष्टेने विचारलं जात होतं. परंतु स्वातंत्र्याचा ध्यास घेणा-या महान लोकांमध्ये एक उत्साह होता. स्वातंत्र्यासाठी मृत्यू पत्करण्याची तयारी ठेवणा-यांमध्ये एक वेगळीच भावना होती. आता स्वतंत्र भारतामध्ये केवळ या देशासाठी जगण्याची जाज्वल्य राष्ट्रभावना निर्माण करण्याची क्षमता आजच्या या नेतृत्वामध्ये आहे.

मी चारही दिशांना हात फिरवून ही गोष्ट बोलतोय. मी काही फक्त माझ्यासाठी बोलतोयअसं नाही. किंवा मी काही या बाजूसाठी बोलतोय असंही नाही. आपण सर्वांनी मिळून ही गोष्ट करूया. आणि यामध्ये मुळात स्वभावानुसार मला स्वतःला कोणताही लाभ दिसत नाही. असा संकुचित विचार करण्याचा माझा स्वभाव अजिबात नाही. लहान स्तरावरअगदी मर्यादित करणंमुळातच मला पसंत नाहीपटतही नाही. आणि म्हणूनच मला कधी कधी वाटत कीसव्वाशे कोटी देशवासियांच्या स्वप्नं आपण जगायचं असेल तर आपल्याला लहान-सहान गोष्टींकडे पाहणंकिंवा संकुचितमर्यादित विचार करणंयाचा आपल्याला अधिकारही नाही. 

जब हौसला बना लिया ऊँची उड़ान का

फिर देखना फिजूल है कद आसमान का ! 

या भावनेने आपण सर्वजण एका नवीन धैर्यानंनवीन मजबूत विचारांच्या साथीनं....पुढं वाटचाल करूया... या सरकारला आत्ता कुठं तीन आठवडे झाले आहेत. परंतु आमच्याकडे एक म्हण आहे- पुत्राची लक्षणं पाळण्यात दिसून येतात. तसं तर या तीन आठवड्यामध्ये आम्हालाही वाटत होतं कीकुठं तरी जावंपुष्पहार घालून घ्यावेतजयघोष करून घ्यावा. परंतु आम्ही तो मार्ग स्वीकारला नाही. आम्हालाही वाटत होतंया निवडणुकीची धामधूम गेली सहा महिने सुरू होती- चला आता काही दिवस आपणही आराम करावा. परंतु आम्ही तो मार्ग निवडला नाही.

आमचा मार्ग तो नाही. आम्हाला तर देशासाठी जगायचं आहे. तीन आठवड्याच्या आत कितीतरी महत्वपूर्ण निर्णय आमच्या या सरकारनं घेतले आहेत. एका गतिशील सरकारनं वेळेचा अगदी क्षण न क्षणाचा उपयोग करून देश कशा प्रकारे पुढं जावू शकेलयाचा विचार केला आहे. मग लहान दुकानदार असोलहान शेतकरी असोशेती-व्यवसायामध्ये मजुरीचं काम करणारा श्रमजीवी असोत्यांना साठ वर्षांच्यानंतर निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय आम्ही घेतला.

आमची प्रधानमंत्री किसान समृद्धी योजना- आम्ही वायदा केला होता कीसर्व शेतकरी बांधवांना या योजनेमध्ये सहभागी करून घेवून त्यांना लाभ देण्यात येईल. अगदी त्याप्रमाणे निर्णय घेवून काम केलं आहे. सैनिकांच्या मुलांना शिष्यवृत्ती देण्यात येते. त्या निधीमध्ये वाढ करण्यात आली आहे. परंतु त्याच्याच जोडीला समाजाच्या सुरक्षेचे कार्य करणा-या आमच्या पोलिस जवानांच्या मुलांनाही या शिष्यवृत्तीचा लाभ मिळावायासाठी एका मोठामहत्वपूर्ण निर्णयही आम्ही घेतला आहे. मानव अधिकाराशी संबंधित महत्वपूर्ण कायदा या संसदेमध्ये आणण्यासाठी तयारी करण्याची आवश्यकता होतीती आम्ही पूर्ण केली आहे.

2022 च्या स्वप्नांची पूर्ती करणेमुख्यमंत्र्यांची बैठक बोलावणेसर्वपक्षीय बैठक बोलावणे आणि सर्व पक्षांच्या प्रमुखांची बैठक बोलावणे- अशा प्रत्येक गोष्टी करून गेल्या तीन आठवड्याच्या आतमध्ये सर्वांना बरोबर घेवून जितक्या वेगानं पुढं जाता येईलतितक्या वेगानं  जाण्याचं काम आम्ही केलं आहे. एका पाठोपाठ एक अशी अनेक कामे मागच्या काही दिवसात आम्ही पूर्ण केली आहेत. आत्ता या इथं केलेल्या कामांची मोजणी मी सुरू केली तर कदाचित रोज किमान तीन कामं आम्ही पूर्ण केली असल्याचं दिसून येईल. आणि म्हणूनच माननीय अध्यक्षजीराष्ट्रपतीजींनी आपल्या भाषणामध्ये आमच्या कामाचा उल्लेख केला आहे. मात्र याचा अर्थ आधीच्या सरकारांनी काही कामच केलं नाहीअसा काही होत नाही.

इथं चर्चा होत होती ती हे धरण बांधलंते धरण बांधलंअमूक बंधारा,धरण निर्माण केलंतमूक धरण बांधलं- अशी खूप काही चर्चा झाली. या चर्चेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उल्लेख केला असता तर खूप चांगलं झालं असतं. हिंदुस्तानामध्ये पाण्यासंबंधी जितक्या नवसंकल्पना अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केला गेलात्या सर्वांचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिले पाहिजे. कारण त्यांच्याच नेतृत्वाखाली या पाणीयोजना तयार करण्यात आल्या आहेत. परंतु त्याचं नेमकं असं आहे कीएका विशिष्ट सीमेपेक्षा जास्त उंचीवर कोणी गेलं तर त्याला इतर काही दिसत नाही.  आणि बाबासाहेबांनी तर केंद्रीय जलमार्गजलसिंचन, ‘नॅव्हिगेशन’ याविषयी काम केलं होतं. पाण्याच्या बाबतीत डॉ. आंबेडकर म्हणायचे, ‘‘ पाण्याअभावी माणसाचं जीवन खूपच कष्टमय बनतं,’’ मला वाटतं कीबाबासाहेबांनी व्यक्त केलेली ही चिंता होती. ही चिंताही पाण्याची समस्या आपण समजून घेवून त्याच्या निवारणासाठी काही ना काही तरी केलं पाहिजे. यासाठी आपल्याला गांभीर्यानं विचार केला पाहिजे.

इथ अनेक धरणांविषयी बोललं गेलं. त्यामध्ये सरदार सरोवर धरणाचाही विषय आला. म्हणून माननीय अध्यक्ष जीमी काही वेळ घेवू इच्छितो. कारण काही वेळेस अनेक प्रकारचे भ्रम निर्माण करून ते पसरविले जातात. बरं त्यांची ‘इको सिस्टम’ अशी आहे कीअशा भ्रमांचं निरसन न करता ते तसेच पुढे पाठवण्यात मौज वाटते. सत्य कधी बाहेर येवू दिलं जात नाही. मी आत्ता याविषयी बोललो तरीसत्य बाहेर येईलयाची कोणतीही हमी देता येणार नाही. ही गोष्ट इथल्या इथंच राहिली जाईल. तरीही  आपण आपल्या कर्तव्याचं पालन केलंयाचा आनंद मात्र नक्कीच मिळेल.

या सरदारा सरोवराच्या धरणाची पायाभरणी 1961 मध्ये पंडित नेहरूंनी केली होती. सरदार वल्लभभाई पटेलयांचं हे धरण म्हणजे एक स्वप्न होतं. परंतु या धरणाची पायाभरणी 1961 मध्ये करण्यात आली. मात्र धरणाच्या कामाला दशकभरापर्यंत मंजुरीही दिली गेली नाही. आता कोणत्याही मंजुरीशिवाय पायाभरणीचा नामफलक तर लावला होता. आणि त्या काळामध्ये सहा हजार कोटी रूपयांचा हा प्रकल्प होता. तो पूर्ण झाला त्यावेळी त्याचा खर्च 60 -70 हजार कोटी  रुपयांपर्यंत पोहोचला.

अशा प्रकारे देशाची सेवा केली गेलीआपणच पहा... इतकंच नाही तर यूपीए सरकारच्या काळातही  या प्रकल्पाचं काम रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. 1986-1987 मध्ये  प्रकल्पावर करण्यात आलेल्या खर्चाचा आकडा सहा हजार कोटी रूपयांवरून 62 हजार कोटीपर्यंत जावून पोहोचला होता. आम्ही आल्यानंतर हे काम पूर्ण केले. यासाठी मला उपोषणाला बसावं लागलं होतं. यूपीए सरकारच्या विरोधामध्ये मला उपोषणाला बसावं लागलं होतं. मुख्यमंत्री होतोकारण या प्रकल्पाचं सुरू असलेलं सर्व प्रकारचं काम थांबवण्यात आलं होतं. यानंतर काम सुरू करण्यात आलं. या प्रकल्पाचं सर्व काम मी आल्यानंतर पूर्ण केली. अगदी अलिकडे पंतप्रधान बनण्याच्या आधी 15 दिवस मी प्रकल्पाच्या कामामध्ये ज्या अडचणी होत्याकाम का थांबलं आहेयाचा विचार करून सगळ्या अडचणी बाजुला केल्या होत्या.

आज जवळपास चार कोटी लोकांना पाणी मिळत आहे. सात महानगरांना107 नगरपालिकांना आणि 9 हजार गावांना शुद्ध पेयजल आता मिळू लागलं आहे. पाण्याची समस्या असल्यानंतर किती त्रास होतो हेराजस्थान आणि गुजरातमधले लोक जास्त चांगलं समजतात. आणि म्हणूनच यावेळी आम्ही ‘जलशक्ती मंत्रालय’ वेगळे बनवले आहे. जलसंकटाकडे आपण गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. आणि म्हणून या हंगामामध्ये आपण जास्तीत लक्ष जलसंचयाकडं दिलं पाहिजे.

आणि मी सर्व आदरणीय संसद सदस्यांना प्रार्थना करतोसर्व एनजीओंना प्रार्थना करतो कीआपण देशामध्ये पाण्याचं महात्म्य वाढवण्यासाठी कशाही प्रकारे योगदान द्यावे आणि सरकारी क्षेत्राच्या बाहेर पडून हे काम करावे. काही झालं तरी पाणी वाचवलं पाहिजे. हे काम करून आपण सामान्य माणसाचं आयुष्य वाचवण्याच्या कामाला मदत करणार आहोत. आणि पाण्याचं संकट दोन लोकांना सर्वात जास्त त्रासदायक ठरत असते. त्यापैकी एक म्हणजे गरीब जनता आणि विशेष करून आमच्या माता-भगिनी पाणी टंचाईमुळं खूप त्रासून जातात.

आमच्या समाजवादी मित्रांना नेमकं काय झालंयमला तरी माहिती नाही. परंतु लोहियाजी खूप आग्रहानं सांगायचे कीदेशातल्या महिलांच्या दोन खूप गंभीर समस्या आहेत. एक पाणी आणि दुसरे शौचालय. लोहियाजी सातत्यानं सांगत होते कीया दोन्ही समस्यांतून आपल्या माता -भगिनींची मुक्तता केली जावी. आम्ही असंख्य शौचालये बनवून एका संकटातून महिलांना मुक्त केलं आहे. आणि आता प्रत्येक घराघरामध्ये नळाने पाणी पुरवठा करून आम्ही पुढं जाणार आहोत. यासाठी आम्ही ‘हर घर को जल’ असा मंत्र तयार केला असून त्याचा जप करीत पुढची वाटचाल करणार आहोत.

मला ठावूक आहेहे काम खूप अवघड आहे. इतकंच नाही तरकोणीतरी आमच्या कामाला तराजूमध्ये तोलून आम्हाला ‘अनुत्तीर्ण’ करू शकतात. आणि मोदी तुम्हाला 100 पैकी 70 गुण मिळणार नाहीततर 50 गुण मिळतीलअसंही म्हणू शकतात. आता जे काही होईल ते पाहता येईल. परंतु कोणाकडेही तक्रार केली जाणार नाही. आम्ही आत्ताच जलशक्ती मंत्रालय स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. जल संचय ही आता या मंत्रालयाची जबाबदारी असणार आहे. जलसंचयाची जबाबदारी हे एक वेगळं महत्वाचं काम आहे. जल सिंचन दुनियेमध्ये चांगले सिद्ध झाले आहे. उसाच्या शेतीला सूक्ष्म जलसिंचन अतिशय लाभदायक ठरते. शेतकरी बांधवांना याबाबतीत सांगितलं पाहिजे. सूक्ष्म जलसिंचनामुळं पाणी खूप मोठ्या प्रमाणावर वाचू शकतं. हे आपल्या शेतकरी बांधवांना पटवून देण्याचं काम कोण करणार आहे?  सूक्ष्म जलसिंचन योजनेसाठी सरकारच्यावतीनं पैसेही दिले जातात. या कारणामुळं पाणी वाचवणं सहज शक्य होणार आहे. अशा अनेक गोष्टींमुळे आपण थेंब-थेंब पाणी वाचवून देशाला आघाडीवर घेवून जावू शकतोहे सांगितले पाहिजे.

कृषी क्षेत्र आमच्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आमच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये पाठीचा कणा आहेपरंतु आपल्याला जुन्या काळातल्या पद्धती-नियमांमधून थोडं बाहेर पडण्याची आवश्यकता आहे. आपल्याला त्याची ‘इनपुट कॉस्ट’ कमीत कमी कशी होईलहे पाहिलं पाहिजे. शून्याधारित बजेटमध्ये शेतीचे प्रयोग सध्या सुरू आहेत. त्याला यशही मिळत आहे. उत्पादनामध्ये कोणत्याही प्रकारे कमतरता यामध्ये येत नाहीत. तसंच क्वालिटी म्हणजे शेतमालाच्या गुणात्मक दर्जा असावायाचा प्रयत्न असतो. सध्या ‘होलिस्टिक हेल्थकेअरच्या काळामध्ये गुणात्मक मालाला चांगली मागणी आहे.

आपण सर्वांनी राजकीय परीघाच्या बाहेर पडून आणि कोणत्याही कार्यक्रमाला सरकारी कार्यक्रम न मानता या देशाच्या शेतकरी बांधवांच्या भल्यासाठीत्यांच्या कल्याणासाठीसंयुक्तपणे काम केले पाहिजे. आपण शेतकरी बांधवांचा हातात हात घेतला पाहिजे. आपल्या शेतकरी बांधवांचे कॉर्पोरेट वर्ल्ड अॅग्रीकल्चर सेक्टरमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक नाही. त्यांना यासाठी आपण प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांच्यासाठी काही नवीन नीती-धोरणेनियम निश्चित केले पाहिजेत. नाहीतर कोणी एखादा ट्रॅक्टर बनवेल आणि तो म्हणेल कीत्यानं गुंतवणूक केली आहे. आम्ही तर प्रत्यक्ष खाद्यान्न प्रक्रियेमध्येगोदामधान्य साठवणूक भांडार निर्मिती करण्यामध्येशीतगृह भांडार निर्मिती करण्यामध्ये कॉर्पोरेट जगताकडून गुंतवणूक केली जावीअशी अपेक्षा करतो. ही काळाची मागणी आहे. आता या मागणीला जोर देण्याचे काम आपल्याला करायचे आहे.

शेतकरी बांधवांना एपीओंच्या माध्यमातून जास्तीत जास्त संधी देवून त्यांच्यासाठी बी-बियाणांपासून ते बाजारापर्यंत एक साखळी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. यामुळे आपल्या कृषी क्षेत्रामध्ये निर्यातीला खूप चांगल्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. त्या क्षेत्रामध्ये परिवर्तन घडवून आणण्यावर आपल्याला भर द्यावा लागणार आहे.

गेल्या वर्षी ज्यावेळी 2.014 मध्ये आम्ही पाहिलं कीडाळीचा भाव हा एका खूप मोठा प्रश्न बनला होता. देशातल्या शेतकरी बांधवांच्या मनाचा मोठेपणा आपण त्याचवेळी पाहिला. मी शेतकरी बांधवांना अगदी साधी विनंती केली कीआपण सर्वांनी डाळींच्या उत्पादनासाठी पुढाकार घ्यावा. माझ्या देशातल्या शेतकरी बांधवांनी डाळ पुरेशा प्रमाणात जनतेला मिळावीयासाठी भरपूर काम केलं. डाळींच्या बाबतीत देशाची गरज आता भागली जात आहे. त्याप्रमाणेच तेलवर्गीय शेंगा आणि इतर पिकांचे उत्पादन घेण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन दिले पाहिजे. देशाला एक थेंबही तेल आयात करण्याची वेळ येवू नये. देशातचं खाद्यतेलाची गरज भागली गेली पाहिजे.

मला वाटतं कीअवघा देश शेतकरी बांधवांना प्रेरणाप्रोत्साहन देवू शकतो. त्याच्याशी आपण जोडले जावू शकतो. या गोष्टींचा विचार करून मी ‘फ्युचरिस्टिक व्हिजनच्या जोडीने ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतकरी बांधवांची ताकद आणि देशाची गरजपूर्ती कशी होवू शकेलयासाठी आपण संयुक्तपणे काम आपण करू शकतो. त्याचबरोबर देशाला पुढे नेता येइ्र्रलअसे मला वाटते.

माननीय अध्यक्ष जीकोणत्याही गोष्टीवर टीका करण्यासाठी आकडेवारीचा प्रत्येकवेळी वापर केला जातोही गोष्ट खरी आहे. परंतु या देशाचं स्वप्न म्हणजे एखाद्या काळामध्ये पूर्ण झालं तर आनंदाची गोष्ट आहे आणि इतरांच्या कार्यकाळामध्ये ते स्वप्न पूर्ण झालं तर मात्र हा काळ वाईट होताअसं म्हणणं योग्य ठरणार आहे का?.... ज्यावेळी देशाची अर्थव्यवस्था 11 किंवा 13 या क्रमांकावर आली त्यावेळी या सभागृहामध्ये किती आनंदानंमोठ्या प्रमाणात बाकं वाजवून या गोष्टीचं स्वागत केलं होतं. सभागृहामध्ये नुसतं आनंदाचउत्साहाचं वातावरण निर्माण केलं होतं. ही गोष्ट म्हणजे खूप मोठी ‘अचिव्हमेंट’ आहेअसं चित्र निर्माण केलं होतं. हा सगळा आनंदोत्सव साजरा केला गेला. स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात आली.  तेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेची क्रमवारी 11 की 13 क्रमांकावर आली होती. परंतु आमचं सरकार आल्यानंतर याच अर्थव्यवस्थेनं सहाचा आकडा पार केला तरीही त्यावेळी मात्र देशाला काही आनंद झाला नाही. असं काही फार मोठं घडलं नाहीअसं चित्रही निर्माण केलं. आता मला सांगारोज कार्यरत असलेल्या प्रत्येक घटकाला याचाही आनंद झाला पाहिजे. आमच्या काळामध्ये सहाव्या क्रमांकावर अर्थ व्यवस्था आणून ठेवण्याचं काम नक्की झाल्यानंतरही त्याचा उल्लेख केला गेला नाही.  जर तुम्हाला  टाकल्यानंतर  आपली अर्थव्यवस्था इतकी मोठी झाल्यानंतर तर आमची कोणी पाठ थोपटली पाहिजे.

किती काळकिती काळ उंचावर राहणार आहेखालचं काहीच दिसू नयेइतक्या उंचावर तुम्हाला जायचं आहे काआपण आगामी काळामध्ये पाच ट्रिलियन डॉलरची आपली अर्थव्यवस्था बनवायची आहे. हेच आम्हा सर्वांचं स्वप्न असलं पाहिजे की नकोआपण सर्वांनी मिळून देशाला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवली पाहिजे की नकोयामध्ये सर्वांना फायदा होणार आहे. आणि मला असं वाटतं कीयासाठी आपण सर्वांनी मिळून नुकसान टाळून सर्वानी मिळून परिश्रम घेण्याची गरज आहे. आणि त्या दिशेने पुढं गेलं पाहिजे. एक स्वप्न उराशी बाळगून आपण वाटचाल केली पाहिजे. आणि मला विश्वास आहे कीआपल्या देशामध्ये मेक इन इंडियाची खूप चेष्टा केली गेली. परंतु देशाला ‘मेक इन इंडिया’ बनवलं पाहिजेहे कोणी नाकारू शकणार आहे काम्हणून ‘मेक इन इंडियाचं स्वप्न पूर्ण केलं पाहिजे.

माननीय अध्‍यक्ष महोदय मी कोणावरही टीका करण्यासाठी आपला वेळ वाया घालवत नाहीमला करण्यासाठी खूप कामे आहेत. पण देशाला काही गोष्टींची माहिती देणे आवश्यक असते. आपल्या देशाकडे सुमारे 200-225 वर्षांचे आयुष बनवण्याचा अनुभव आहे200-225 वर्षांचा आणि जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा या देशाकडे असे 18 कारखाने होते जे आयुषची निर्मिती करत होते आणि देश स्वतंत्र झाला तेव्हा चीन आयुषच्या क्षेत्रात शून्यावर होता. शून्यावर... त्यांच्याकडे कोणताही अनुभव नव्हताकोणताही कारखाना नव्हता. आज चीन जगभरात आपली संरक्षण सामग्री निर्यात करत आहे आणि आपण जगातले सर्वात मोठे आयातदार आहोत. या वस्तुस्थितीमधून आपल्याला देशाला बाहेर आणायचे आहे. मेक इन इंडिया ची थट्टा करून काय साध्य करणार आहातकदाचित असे होऊ शकेल की रात्री चांगली झोप लागेल पण देशाचे भले होणार नाही आणि म्हणूनच हो.... आणखी चांगले काय बोलता येईल.

अध्यक्ष महोदयमी तुमचा अतिशय आभारी आहे आणि या सभागृहाचा देखील आभारी आहे की मला ही संधी दिली. भारत जगातल्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये कशा प्रकारे समाविष्ट होईलभारत निर्यातीला कशा प्रकारे चालना देईल, make in India मध्ये कशा प्रकारे वाढ करेल, startup च्या विश्वात आपले युवा खूप काही करत आहेत. जय जवानजय किसानजय विज्ञान आणि आता जय अनुसंधान.

आपला देश या गोष्टींना कशा प्रकारे बळ देईल आणि आपण आपल्या युवकांना रोजगारही देऊ शकू. आपल्या देशात पर्यटनाच्या अमाप संधी आहेत. पण आपणच आपल्या देशाविषयी इतकी कमीपणाची भावना निर्माण केली आहे आणि त्यामुळेच जगातील लोकांना भारताविषयी अभिमान वाटावात्याचे आकर्षण वाटावे यासाठी काही करण्यामध्ये आपण कमी पडलो आहोत.

स्वच्छता अभियानाने एक सामर्थ्य प्रदान केले आहे. आपण पर्यटनावर भर देऊ शकतो आणि भारतात रोजगाराच्या संधींमध्ये वाढ होऊ शकते आणि जगात पर्यटनाच्या माध्यमातून आपण भारताची एक नवी ओळख निर्माण करू शकतो. आपल्याला या गोष्टींना चालना द्यायची आहे. आगामी काळात देशाला आधुनिक पायाभूत सुविधांच्या दिशेने घेऊन जायचे आहे. 100 लाख कोटी रुपये,  हे देखील कमी पडतील इतकी देशाची गरज आहे.

पण इतक्या मोठे स्वप्न उराशी बाळगून आपल्याला आगेकूच करायची आहे आणि जगभरातून ज्या काही व्यवस्था मिळतील त्या व्यवस्थांचा उपयोग करायचा आहे आणि या सर्व गोष्टींच्या मागे आपले स्वप्न- नवा भारतआपले स्वप्न आधुनिक भारत आणि आपले स्वप्न  ease of living. सामान्‍य मानवाच्या जीवनात सहजता असेलत्याला आपली स्वप्ने साकार करण्याच्या सर्व संधी उपलब्ध असतील. अशा प्रकारच्या व्यवस्था विकसित करणे आणि याच गोष्टी घेऊन आणि मग ते गाव असो वा शहर असोप्रत्येकासाठी समान संधी निर्माण करून आपल्या पुढे वाटचाल करायची आहे.

आज जगात आपण आपल्या  demographic dividend म्हणजेच जनसांख्यिकीय लाभांशाची चर्चा करतोआपल्या देशाकडे युवा शक्ती आहे. पण जगाची जी गरज आहे त्या गरजेनुसार आपण आपल्या युवकांना तयार करू शकत आहोत काआपल्याला खूप काही करण्याची गरज आहे. कौशल्य विकासाचा विचार केला तर आपल्याला त्यांच्या मापदंडांमध्येही वाढ करावी लागेल आणि प्रत्येक ठिकाणी असलेला वाव लक्षात घेऊन ती संधी साधावी लागेल आणि आपण आधुनिकतेच्या दिशेने कसे वाटचाल करू. राष्ट्रपती महोदयांनी ही बाब अधोरेखित केली आहे.

सरकारने बाजारपेठेसाठी एका JAM ची व्‍यवस्‍था केली आहे. माझी अशी इच्छा आहे की जिथे कुठे तुमची राज्य सरकारे असतीलज्या कोणत्या पक्षाची असतीलदेशाने  JAM portal चा वापर केला पाहिजे. खूप मोठ्या प्रमाणावर पैशाची बचत होईल आणि अनेक लोकांना मदत होऊ शकेल आणि सामान्यात सामान्य लोकांना देखील आपली उत्पादने सरकारच्या प्रवेशद्वारापर्यंत आणता येतील या दिशेने आपल्याला काम केले पाहिजेहा माझा आग्रह आहे.

भ्रष्टाचाराच्या विरोधातला लढा सुरूच राहील. आपल्याला दूषणे दिली जात आहेत की अमुक एकाला तुरुंगात का नाही टाकले! पण ही आणीबाणी नाही आहे जेणकरून सरकार कोणालाही तुरुंगात टाकेलही लोकशाही आहे. हे काम न्यायपालिकेचे आहे. आम्ही कायद्याने चालणारे लोक आहोत आणि कोणाला जामीन मिळाला असेल तर त्याचा त्याने आनंद मानावात्यात काय आहे. सूडाच्या भावनेने काम होता कामा नये. पण भ्रष्टाचाराच्या विरोधातला आमचा लढा सुरूच राहील. जितकी बुद्धी आम्हाला देवाने दिली आहेशक्ती दिली आहे. पण जे काही करू ते अतिशय प्रामाणिकपणे करूकोणाविषयी हीन भावना ठेवून करणार नाही आणि देशाने आम्हाला इतके दिले आहे... इतके दिले आहे की आम्हाला गैरमार्गावर जायची गरजच नाही. तंत्रज्ञानाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर करता येऊ शकतो.

माननीय अध्यक्ष महोदयदहशतवादाच्या विषयावर देशात मतभेद कसे काय होऊ शकतात... मानवतेसाठी हे एक सर्वात मोठे संकट आहे आणि मानवतेसाठी एक मोठे आव्हान आहेज्यांचा मानवतेवर विश्वास आहे त्या सर्वांनी एकत्र येऊन या गोष्टीसाठी संघर्ष केला पाहिजे

आपण महिला सक्षमीकरणावर चर्चा करूयाकाँग्रेसला तर अनेक वेळा चांगल्या संधी मिळाल्या होत्यापण का ते ठाऊक नाही..... इतक्या उंचीवर आहेत की काही गोष्टी दिसतच नाहीतलपून राहातात. 50 च्या दशकात समान नागरी कायद्याची चर्चा करत होतेकाँग्रेसकडे संधी चालून आली होती पण काँग्रेसने ती संधी गमावली आणि त्यांनी हिंदू कोड बिल आणून आपली गाडी दामटत राहिले. त्यानंतर 35 वर्षांनी काँग्रेसला दुसरी संधी मिळाली. शाहबानो प्रकरणात- सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण मदत दिली होती.... आणि देशात स्त्री-पुरष समानतेसाठी एक चांगले वातावरण निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती पण त्या उंचीवरून खाली पाहायला त्यांनी नकार दिला आणि त्यांनी ती संधी गमावली...... आज 35 वर्षांनी पुन्हा एकदा काँग्रेसला संधी उपलब्ध झाली आहे... आम्ही विधेयक घेऊन आलो आहोत आणि देशाच्या महिलांचा सन्मान आहे. त्याचा संबंध कोणत्याही धर्माशी जोडण्याची गरज नाही.

माझी अशी इच्छा आहे की काँग्रेस पक्ष विशेषतः एक गोष्ट त्यावेळी जेव्हा शाहबानो प्रकरण सुरू होतेत्या सर्व कामकाजात जे मंत्री होते त्यांनी टीव्हीवर एका मुलाखतीमध्ये जी गोष्ट सांगितली ..... ती चकित करणारी आहे... माझ्याकडे तिच्या सत्यतेची पडताळणी करण्यासाठी काहीही नाहीमी जे ऐकले आहे ते मी सांगत आहे. त्यांनी त्या काळातील काँग्रेसच्या मंत्र्याच्या तोंडून कोणत्या गोष्टी बाहेर पडायच्या त्या सांगितल्या आहेत आणि त्यांनी सांगितले की जेव्हा शाहबानो प्रकरण सुरू होते तेव्हा काँग्रेसच्या कोणत्या मंत्र्यांनी सांगितले होते की मुसलमानांच्या उद्धाराची जबाबदारी काँग्रेसची नाही आहे. बघा किती गंभीर बाब आहे..... मुसलमानांच्या उद्धाराची जबाबदारी काँग्रेसची नाही आहे. If they want to lie in the gutter let them be’ आपल्या देशाचे नागरिक आहेत त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी..... मिळेलमिळेल काळजी करू नका हो मिळेल मी तुम्हाला  you tube ची link पाठवून देईन.

माननीय अध्‍यक्ष महोदयमी जास्त वेळ घेणार नाही पण राष्ट्रपती महोदयांनी गांधीजींचे 150वे जयंती वर्ष आणि स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण होत असल्याची गोष्ट सांगितली आहे... आपण पाहतो की आपल्या देशात कोणत्या ना कोणत्या कारणाने अधिकारांवरच सर्व गोष्टी केंद्रित झालेल्या असतातअधिकारांचीच चिंता केली जाते. ही एक संधी आहे की आपल्या देशाचा संपूर्ण कायापालट करून आपण अधिकारांपासून कर्तव्याच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे आणि जनचेतना जागवणे हे  लोकप्रतिनिधींचे देखील काम आहे. अशा वेळी नेतृत्व करणे  आणि हा विषय असा नाही आहे जे मी सांगत आहे.... आपल्यापैकी प्रत्येकानेच ऐकले असेल की कर्तव्याचे सामर्थ्य किती असते.

महात्‍मा गांधी म्हणत असायचे- every right carries  with it a corresponding duty ! लोहियाजी देखील म्हणायचेकर्तव्‍य बजावताना नफा- तोटा पाहायचा नसतो आणि त्यांच्या या वचनांना मी जरा सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करतो.... हे जे त्यांचे वचन आहे ही खूप जुनी गोष्ट आहे  जगाला भारताची ही सर्वात मोठी शिकवण आहे की  येथे सर्वात आधी कर्तव्य येते आणि याच कर्तव्यांमधून अधिकारांचा जन्म होतो. आजच्या आधुनिक भौतिकवादी जगात जिथे प्रत्येक ठिकाणी संघर्ष पाहायला मिळत आहेततिथे प्रत्येक जण आपल्या अधिकारांचा आणि सोयीसुविधांचा विचार करत असतोक्वचितच कोणी आपल्या कर्तव्यांचा विचार करत असेलहेच संघर्षाचे कारण आहे. अधिकार आणि सोयीसुविधा यांच्यासाठी आपण संघर्ष देखील केला ही वस्तुस्थिती आहे पण असे करताना आपण जर आपल्या कर्तव्यांना विसरलो तर हे अधिकार आणि सोयीसुविधा आपल्याकडे टिकून राहणार नाहीत.

मला वाटते की हे अगदी स्पष्ट आहे. आपले हे उत्तरदायित्व आहेज्या महापुरुषानं ही गोष्ट सांगितली आहे त्यानंतर त्यांच्या शिकवण विस्मरणात गेली  पण त्या महापुरुषाची पुन्हा आठवण ठेवून आपण तिची पुन्हा सुरुवात करू शकतो काआणि ते महापुरुष होते ज्यांनी सांगितले होते 14 जुलै 1951 रोजी जेव्हा निवडणुकीच्या आधी काँग्रेसचा पहिला जाहिरनामा घोषित करण्यात येत होता. त्या घोषणेच्या वेळी पंडीत नेहरूंनी हा परिच्छेद सांगितला होता.

मला असे वाटते की पंडित नेहरू यांनी जे स्वप्न 1951मध्ये पाहिले होतेते स्वप्न पूर्ण करण्यासाठीदेशाला कर्तव्याच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठीपंडितजींच्या त्या इच्छेचे महत्त्व लक्षात घेऊन आपण पुढे जाऊ शकतो का?..... आपण सर्वांनी एकत्र येऊन हे ठरवले पाहिजे आणि पुढे वाटचाल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे

आपल्या देशाने हे अनुभवले आहेजेव्हा महात्मा गांधी यांनी देशातल्या युवकांना सांगितले की पुस्तके बाजूला ठेवास्वातंत्र्यासाठी घराबाहेर पडा- लोक निघाले होते. लाल बहादूर शास्त्री यांनी सांगितले होते की एक वेळचे जेवण सोडून द्याअन्नधान्याचे उत्पादन करादेशाने केले होते. माझ्या सारख्या सामान्य व्यक्तीने सांगितले की स्वयंपाकाच्या गॅसवरच्या अनुदानाचा त्याग करा- लोकांनी अनुदानाचा त्याग केला. म्हणजेच देश तयार आहे..... देश तयार आहे.

चला.... आपण सर्वांनी एकत्र येऊन नव्या भारताच्या निर्मितीसाठीआधुनिक भारताच्या निर्मितीसाठीराजकारणाच्या स्वतःच्या सीमांपेक्षाही देश वर असतोपक्षापेक्षा देश मोठा असतो. देशाच्या कोट्यवधी लोकांच्या आशा-आकांक्षा असतातत्या पूर्ण करण्यासाठी राष्ट्रपती महोदयांनी आपल्याला मार्गदर्शन केले आहेत्यांचे आभार मानताना.... आपण केवळ त्यांच्या भाषणाचे आभार नाहीततर त्या भाषणातील राष्ट्रहितासाठी काही तरी करण्याची भावना आपल्यात निर्माण करून खऱ्या अर्थाने आभार मानले पाहिजेत.

याच एका अपेक्षेने या चर्चेला अतिशय समृद्ध बनवणाऱ्या सर्व आदरणीय सदस्यांचे अभिनंदन करत मी माझ्या भाषणाचा समारोप करतो.

अध्यक्ष महोदय तुम्हाला देखील खूप खूप धन्यवाद.

 

 

D.Wankhede/S.Bedekar/S.Patil/D.Rane

 


(Release ID: 1576308) Visitor Counter : 253


Read this release in: English