सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

29 जून 2019 ला सांख्यिकी दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

प्रविष्टि तिथि: 27 JUN 2019 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 जून 2019

 

दैनंदिन जीवनात सांख्यिकीशास्त्र लोकप्रिय व्हावे, यासाठी सरकार सांख्यिकी दिवस साजरा करते. प्रा. पी.सी. महालानालोबिस यांच्या जयंतीदिनी 29 जूनला राष्ट्रीय स्तरावर सांख्यिकी दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय सांख्यिकी यंत्रणा स्थापित करण्यात त्यांचे योगदान अमूल्य आहे.

सांख्यिकी दिनाचा मुख्य कार्यक्रम 29 जून 2019 ला नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात होईल. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी खात्याचे राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) राव इंद्रिजित सिंह कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

 

 

B.Gokhale/S.Kakade/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1575998) आगंतुक पटल : 125
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English