पंतप्रधान कार्यालय

4 आणि 5 मार्चला पंतप्रधान गुजरात दौऱ्यावर


अहमदाबाद मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्या उद्‌घाटन करणार

Posted On: 03 MAR 2019 7:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  3 मार्च 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 आणि 5 मार्चला गुजरात दौऱ्यावर राहणार असून,जामनगर, जासपूर आणि अहमदाबादला ते 4 तारखेला तर अडलाज आणि वस्त्राल या ठिकाणांना ते 5 मार्चला भेट देणार आहेत.

4 मार्चला पंतप्रधान,जामनगर मधे,वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसराला भेट देऊन विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करतील.यामध्ये यांचा समावेश आहे-

गुरु गोविंदसिंह रुग्णालयाच्या जोड भवनाचे राष्ट्रार्पण -

750 खाटांच्या गुरु गोविंदसिंह रुग्णालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात येईल.

रुग्णालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या पीजी वसतिगृहाचे उद्‌घाटन ते करतील.

रुग्णालयाला भेट देऊन पंतप्रधान विद्यार्थ्यांशीआणि रुग्णालयाच्या फॅकल्टीशी संवाद साधतील.

सौनी प्रकल्पाचेही पंतप्रधान उद्‌घाटन करतील.

बटण दाबून सौनी प्रकल्पाचे पंतप्रधान उद्‌घाटन करतील.

 

सौनी प्रकल्पामधे, दोन योजनांचे लोकार्पण होणार आहे.जोडिया निक्षारीकरण कारखान्यासाठी भूमिपूजनही ते करणार आहेत.

वांद्रे- जामनगर हमसफर एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार

वांद्रे- जामनगर हमसफर एक्सप्रेसला, पंतप्रधान व्हिडीओ लिंकद्वारे हिरवा झेंडा दाखवणारआहेत.

इतर प्रकल्प

पट्टीकेचे अनावरण करून, पंतप्रधान,आजी-3 ते खिजडिया या 51 किलोमीटर च्या वाहिनीचे लोकार्पण करतील.राजकोट-कानालूस रेल्वे मार्ग दुपदरीकरणासाठी पायाभरणी पंतप्रधान करणार आहेत.

जामनगर महापालिकेने बांधलेल्या 448 घरांपैकी निवडक लाभार्थींना तसेच जामनगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने बांधलेल्या 1008 सदनिकापैकी निवडक लाभार्थींना ते किल्ल्या सुपूर्द करतील.यावेळी ते उपस्थिताना संबोधित करतील.

जासपूर- इथे पंतप्रधान विश्व ऊमियाधाम संकुलासाठी भूमिपूजन करतील.

यावेळी ते उपस्थिताना संबोधित करतील.

वस्त्राल गाव मेट्रो स्थानक अहमदाबाद-

वस्त्राल गाव मेट्रो स्थानक इथे पंतप्रधान अहमदाबाद मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करतील. मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ते भूमी पूजनही करतील.

अहमदाबाद मेट्रोच्या कॉमन मोबिलिटी कार्डचे ते उद्घाटन करतील.

त्यानंतर ते मेट्रोला हिरवा झेंडा दाखवून वस्त्राल गाव मेट्रो स्थानकापासून प्रवासही करतील. अहमदाबाद मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रीमंडळाने फेब्रुवारी 2019 मधे मंजुरी दिली होती.टप्पा 2 मधे 2 कॉरीडॉर राहणार असून त्याची एकूण लांबी 28.254 किमी असेल. प्रवाश्यांना विशेषतः अहमदाबादआणि गांधीनगर भागातल्या प्रवाश्यांना यामुळे आरामदायी आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे. अहमदाबाद मेट्रो रेल्वे टप्पा 1 प्रकल्प एकूण 40.03 किमीचा असून त्यापैकी 6.5 किमी भूमिगत तर उर्वरित उन्नत मार्ग आहे.

हा मेट्रो प्रकल्प कनेक्टीविटी प्रदान करण्याबरोबरच प्रवासाचा वेळ कमी करून नागरी भागातल्या जनतेचे जीवन सुकर करणार आहे.

बीजे वैद्यकीय महाविद्यालय, अहमदाबाद-

बीजे वैद्यकीय महाविद्यालय मैदानावर, पंतप्रधान,आरोग्य आणि रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांचे उद्‌घाटन करतील.

आरोग्य

अहमदाबाद विभागात बांधण्यात आलेल्या विविध रुग्णालयांचे पंतप्रधान,राष्ट्रार्पण करतील.यामध्ये महिला आणि बालके आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालय,कर्करोग रुग्णालय,नेत्र रुग्णालय आणि दंत रुग्णालयाचा यात समावेश आहे.

अहमदाबाद विभागातल्या आरोग्य देखभाल क्षेत्राला या रूग्णालयांमुळे मोठी चालना मिळणार आहे. अहमदाबाद विभाग आणि नजीकच्या प्रांतांतल्या जनतेला यामुळे दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

पीएम –जेएवाय – आयुष्मान भारत योजनेतल्या निवडक लाभार्थींना पंतप्रधानांच्या हस्ते गोल्डन कार्ड वितरीत करण्यात येतील.

रेल्वे

पाटण-बिंदी रेल्वे मार्गाचे पंतप्रधान उद्घाटन करतील.दाहोद रेल्वे कारखान्याचेही ते राष्ट्रार्पण करणार आहेत.या अद्ययावत कारखान्यामुळे रेल्वे डबे पीओएच क्षमतेत मासिक 150 डब्यापर्यंत भर पडणार आहे.

त्यानंतर पंतप्रधान एका सभेला संबोधित करतील.

नव्या नागरी रुग्णालयाला भेट देऊन 1200 खाटांच्या या रुग्णालयाचेते उदघाटन करणार आहेत.अहमदाबाद इथल्या नव्या कर्करोग आणि नेत्र रुग्णालयालाही ते भेट देणार आहेत.

5 मार्च 2019

अडालज, गांधीनगर-

5 मार्चला,पंतप्रधान,अडालज इथे अन्नपूर्णा धाम ट्रस्ट ला भेट देतील.शिक्षण भवन आणि विद्यार्थी भवनाचे भूमिपूजन पंतप्रधान करणार आहेत.

पंतप्रधान, उपस्थितांना संबोधित करणार आहेत

पीएम-एसवायएम -

प्रधान मंत्री श्रम योगी मान-धन योजनेचे उद्‌घाटन-

वस्त्राल इथे असंघटित क्षेत्रातल्या कामगारांसाठीच्या पेन्शन योजनेचे, लाभार्थीना ऑनलाइन निधी हस्तांतरित करून उद्‌घाटन करतील.

या योजनेच्या लाभार्थीना,पीएम-एसवायएम पेन्शन कार्डचे वाटप ते करतील.

पीएम-एसवायएम योजनेविषयी-

2019-20 च्या अंतरिम अर्थसंकल्पात,केंद्र सरकारने, प्रधान मंत्री श्रम योगी मान-धन, पीएम-एसवायएम ही महा पेन्शन योजना जाहीर केली. याद्वारे ज्यांचे मासिक उत्पन्न 15000 अथवा त्यापेक्षा कमी आहे अशा असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक संरक्षण देणारी ही योजना आहे.

ही ऐच्छिक आणि योगदानपर पेन्शन योजना आहे,ज्यामध्ये प्रत्येक धारकाला 60 वर्षानंतर, दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळेल.

लाभार्थीच्या वयानुसार त्याचे योगदान किती हे केंद्र सरकार निश्चित करणार आहे.

या योजनेअंतर्गत, येत्या पाच वर्षात असंघटित क्षेत्रातल्या किमान 10 कोटी कामगारांना याचा लाभ होईल अशी अपेक्षा आहे.

भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनांपैकी निम्मे उत्पादन,असंघटित क्षेत्रातल्या 40 कोटी पेक्षा जास्त कामगारांकडून येते.यामध्ये,रस्त्यावर विक्री करणारे विक्रेते,बांधकाम मजूर,विडी कामगार,कचरा वाचणारे आणि इतरांचा समावेश आहे

आयुष्यमान भारत अंतर्गत पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य कवचासह आणि प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना यासह पीएम-एसवायएम योजनेमुळे,असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना,वृद्धावस्थेत सर्वंकष सामाजिक सुरक्षा कवच सुनिश्चित होणार आहे.

 

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 



(Release ID: 1575410) Visitor Counter : 38


Read this release in: English