मंत्रिमंडळ

होमियोपॅथीमध्ये सुधारणा


केंद्रीय होमियोपॅथी परिषदेच्या कार्यकाळात 18 मे 2018 पासून 2 वर्षांनी वाढ

होमियोपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती ) विधेयक, 2019 ला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 12 JUN 2019 8:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12 जून 2019

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने होमियोपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती) मसुदा  विधेयक, 2019 ला मंजुरी दिली आहे.

 

प्रभाव :

या विधेयकात केंद्रीय परिषदेचा अवधी सध्याच्या एक वर्षावरुन वाढवून दोन वर्षे करण्याची तरतूद आहे, जेणेकरून संचालक मंडळाचा कार्यकाळ  17 मे , 2019 पासून आणखी एक वर्षासाठी वाढवता येईल.

यामुळे केंद्रीय होमियोपॅथी परिषदेला आपल्या अधिकारांचा वापर आणि परिषदेचे काम पार पाडण्यात मदत मिळेल.

अंमलबजावणी :

हे  विधेयक होमियोपॅथी केंद्रीय परिषद (दुरुस्ती ) विधेयक, 2019 ची जागा घेईल. संचालक मंडळाचा कार्यकाळ एक वर्षाने वाढेल.

 

 

B.Gokhale/S.Kane/D.Rane



(Release ID: 1574154) Visitor Counter : 84


Read this release in: English