मंत्रिमंडळ
जम्मू आणि काश्मीर मधे राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीत 3 जुलै पासून सहा महिन्यांनी वाढ करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी
संसदेच्या आगामी अधिवेशनात या संबंधिचा प्रस्ताव मांडणार
प्रविष्टि तिथि:
12 JUN 2019 8:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालांनी राज्यातल्या स्थितीबाबत दिलेल्या अहवालाच्या आधारे संविधानाच्या कलम 356 (4) अन्वये तिथल्या राष्ट्रपती राजवटीचा कालावधी 3 जुलै 2019 पासून आणखी सहा महिने वाढवायला मंजुरी दिली आहे.
प्रभाव:
या निर्णयामुळे जम्मू आणि काश्मीरमधे राष्ट्रपती राजवट 3 जुलै 2019 पासून आणखी सहा महिने वाढवण्यात येणार आहे.
सध्याची राष्ट्रपती राजवटीची मुदत 2 जुलै 2019 रोजी संपत असून, राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट आणखी सहा महिन्यांनी वाढवण्याची शिफारस केली होती.
अंमलबजावणी:
संसदेची मंजुरी घेण्यासंदर्भातला प्रस्ताव संसदेच्या आगामी अधिवेशनात दोन्ही सभागृहांमधे मांडण्यात येईल.
B.Gokhale/S.Kane/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1574113)
आगंतुक पटल : 254
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English