श्रम आणि रोजगार मंत्रालय
बाल मजुरी रोखण्यासाठी सरकारचे बहुआयामी धोरण – हिरालाल सामरिया
प्रविष्टि तिथि:
12 JUN 2019 4:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 जून 2019
जागतिक बाल मजुरी विरोधी दिनानिमित्त श्रम आणि रोजगार मंत्रालय आणि व्ही व्ही गिरी राष्ट्रीय श्रम संस्थेने, आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या सहकार्याने, नवी दिल्लीत शाश्वत विकास उद्दिष्ट साध्य करण्याबाबत आणि देशातील बाल मजुरी रोखण्याबाबत एक चर्चा सत्र आयोजित केले होते.
‘मुलांनी शेतात काम करु नये, तर आपल्या स्वप्नांवर काम करावे’, ही यंदाच्या बाल मजुरी विरोधी दिनाची संकल्पना आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव हिरालाल सामरिया यांनी चर्चा सत्राच्या उद्घाटनपर भाषणात सांगितले की, देशातील बाल मजुरीची समस्या संपवण्यासाठी सरकारने बहुआयामी धोरण स्वीकारले आहे, तसेच ही प्रथा बंद करण्यासाठी विविध कायदे आणि नियमांची अंमलबजावणी करण्याच्या महत्वावर त्यांनी भर दिला. मुलांसाठी शाळा ही आदर्श जागा आहे, असे ते म्हणाले. बाल कामगार प्रतिबंध कायद्यांतर्गत देशभरात 14 वर्षाखालील मुलांना कामावर ठेवण्यास बंदी आहे.
B.Gokhale/S.Kane/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1574023)
आगंतुक पटल : 132
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English