पंतप्रधान कार्यालय
डी डी फ्री डिशवर संबंधित राज्यांच्या दूरदर्शन वाहिन्या दिसू लागल्याबद्दल पंतप्रधानांनी लोकांचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
09 MAR 2019 7:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मार्च 2019
डी डी फ्री डिशवर राज्यांच्या दूरदर्शन वाहिन्या दिसू लागल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबंधित राज्यांच्या लोकांचे अभिनंदन केले आहे.
“डी डी फ्री डिशच्याद्वारे प्रसारभारतीने आणखी 11 राज्यांच्या दूरदर्शन वाहिन्या भारतातल्या उपग्रहावर आणल्या असल्याची नोंद घेताना आनंद होत आहे. यामध्ये पूर्वोत्तर राज्यातल्या पाच वाहिन्यांचा समावेश आहे. यामुळे स्थानिक संस्कृती मजबूत व्हायला आणि लोकांच्या आकांक्षा पूर्ण व्हायला मदत होणार आहे.
छत्तीसगड, गोवा, हरियाणा, झारखंड, मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा आणि उत्तराखंड मधल्या लोकांना डी डी फ्री डिशवर पहिल्यांदाच स्थानिक दूरदर्शन वाहिन्या उपलब्ध होत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/J.Patankar/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1573868)
आगंतुक पटल : 103
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English