माहिती आणि प्रसारण मंत्रालय

पर्यावरण रक्षणाच्या मोहिमेत अनेक मोठे कलाकार सहभागी होणार प्रकाश जावडेकर उद्या मुंबईत फिल्म्स डिवीजनच्या संकुलात व्रुक्षारोपण करणार

Posted On: 05 JUN 2019 7:47PM by PIB Mumbai

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर उद्या मुंबईत फिल्म्स डिविजनच्या संकुलात वृक्षारोपण करून #SelfieWithSapling  अभियानाच्या माध्यमातून पर्यावरण रक्षणाबाबत जनजाग्रुती करण्याची मोहीम पुढे नेतील. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयालाही ते भेट देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षी जानेवारी महिन्यात या संग्रहालयाचे उद्घाटन केले होते.  या भेटीदरम्यान ते चित्रपट क्षेत्रातील आघाडीच्या कलाकारांशी संवाद साधतील आणि भावी पिढ्यांसाठी पर्यावरण रक्षणाचे महत्वकार्बन उत्सर्जन कमी करणे आणि शाश्वततेचा संदेश पोहचवण्याच्या अभियानात पुढाकार घेण्याचे आवाहन करतील.

जावडेकर यांनी आज नवी दिल्लीत पर्यावरण भवनाच्या परिसरात वृक्षारोपण केले.  यावेळी प्रसिद्ध क्रिकेटपटू कपिलदेवअभिनेता जकी श्रॉफरणदीप हुडा आणि ख्यातनाम लोकसंगीत गायिका मालिनी अवस्थी उपस्थित होते.

***

MC/IJ/SK


(Release ID: 1573513) Visitor Counter : 86
Read this release in: English