आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून डॉ. हर्ष वर्धन यांनी स्वीकारला पदभार

Posted On: 03 JUN 2019 6:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2019

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री म्हणून डॉ. हर्ष वर्धन यांनी आज निर्माण भवन येथे पदभार स्वीकारला. निर्माण भवनपर्यंत सायकलवरुन जाऊन हरीत धरतीसाठी आपण हे चांगले कार्य केल्याचे सांगितले.

देशातल्या जनतेच्या आरोग्याला केंद्र सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे ते म्हणाले. जनतेने सकारात्मक आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करुन निरोगी राहावे यासाठी प्रोत्साहनात्मक आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना धोरण मजबूत करण्यावर सरकार भर देईल.

‘प्रधानमंत्री जन औषधी योजना’ म्हणजेच ‘पीएमजेएवाय’ पासून सध्या वंचित असलेल्या गरीबांचा समावेश या योजनेत व्हावा यासाठी योजनेच्या पात्रता निकषाचा विस्तार करण्याचा विचार करणार असल्याचे हर्ष वर्धन यांनी आयुष्मान भारत विषयी बोलताना सांगितले. सूचीमध्ये अधिक खाजगी रुग्णालयांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. आयुष्मान भारत योजनेच्या अंमलबजावणीतले अडथळे दूर करुन सामान्य जनतेला ही योजना सहज प्राप्त राहावी यासाठी सरकार प्रयत्नशील राहील. आयुष्मान भारत- ‘पीएमजेएवाय’ आणि हेल्थ ॲण्ड वेलनेस सेंटर यांना जन चळवळीचे स्वरुप प्राप्‍त व्हावे यावर भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोक सहभागातून आरोग्याला जन आंदोलनाचे स्वरुप देण्यावर त्यांनी भर दिला.  

2025 पर्यंत भारत क्षय रोग मूक्त करण्यावर त्यांनी जोर दिला. कुष्ठरोग आणि काळा आजार यांच्या निर्मूलनासाठी एकत्रित आणि कालबद्ध कृती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एमसीआयची पुनर्रचना यासारखी प्रलंबित विधेयकं मार्गी लावून वैद्यकीय शिक्षण सुधारणा अधिक मजबूत करणार असल्याचे आरोग्य मंत्री म्हणाले.

N.Sapre/N.Chitale/P.Malandkar

 

 


(Release ID: 1573286) अभ्यागत कक्ष : 96
Read this releasein: English