आदिवासी विकास मंत्रालय
केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री म्हणून अर्जुन मुंडा यांनी स्वीकारला पदभार
प्रविष्टि तिथि:
03 JUN 2019 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जून 2019
केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री म्हणून अर्जुन मुंडा यांनी आज पदभार स्वीकारला तर आदिवासी कल्याण राज्यमंत्री म्हणून रेणुका सिंह यांनीही कार्यभार स्वीकारला.
त्यानंतर अर्जुन मुंडा यांनी आदिवासी कल्याण सचिव दिपक खांडेकर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन कार्यक्रम आणि प्रकल्पांचा आढावा घेतला.
झारखंडमधल्या पूर्व सिंघभूममधल्या जमशेदपूर येथे 3 मे 1968 मध्ये अर्जुन मुंडा यांचा जन्म झाला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झारखंडमधल्या खुंटी मतदार संघातून ते निवडून आले आहेत.
2003 ते 2006 या काळात ते झारखंडच्या मुख्यमंत्री पदावर राहिले. 2006 ते 2008 या काळात झारखंडमधे विरोधी पक्ष नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
N.Sapre/N.Chitale/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1573282)
आगंतुक पटल : 94
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English