निती आयोग

केंद्रीय नियोजन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) म्हणून राव इंद्रजित सिंह यांनी स्वीकारला पदभार


2022 पर्यंत नव भारत निर्माण करण्यासाठी काम करण्यावर राहणार भर

प्रविष्टि तिथि: 03 JUN 2019 1:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 जून 2019

 

केंद्रीय नियोजन राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) म्हणून राव इंद्रजित सिंह यांनी आज पदभार स्वीकारला. 2022 पर्यंत नव भारताची निर्मिती करण्यासाठी काम करण्यावर आपला भर राहील. सर्वसमावेशी आणि सर्वांगीण विकासाला आपले प्राधान्य राहील असे ते म्हणाले. नीति आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत त्यांनी एक बैठक घेऊन या आधीच्या कार्याचा आढावा घेतला.

11 फेब्रुवारी 1950 मध्ये हरियाणातल्या रेवाडी येथे जन्मलेले राव इंद्रजित सिंह नुकत्याच झालेल्या निवडणुकीत गुरुग्राम मतदारसंघातून निवडून आले आहेत. दिल्ली विद्यापीठाची एलएलबी पदवी प्राप्‍त केलेले राव इंद्रजित सिंह यांनी हिंदू कॉलेजमधून बी.ए पदवी घेतली आहे.

5 जुलै 2016 ते 3 सप्टेंबर 2017 या काळात नियोजन (स्वतंत्र कार्यभार), नागरी विकास, गृहनिर्माण आणि नागरी दारिद्रय निर्मूलन या विभागांचे राज्यमंत्री म्हणून काम केले. 9 नोव्हेंबर 2014 ते 5 जुलै 2016 या काळात नियोजन विभागाचा स्वतंत्र कार्यभार तर संरक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले.

राव इंद्रजित सिंह पाचव्यांदा खासदार झाले आहेत. हरियाणा विधानसभेत आमदार म्हणूनही ते चार वेळा निवडून आले आहेत. 

N.Sapre/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1573234) आगंतुक पटल : 138
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English