माहिती आणि प्रसारण मंत्रालय

ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्टस्‌ ॲण्ड सायन्स संस्थेचे अध्यक्ष जॉन बेली यांच्या सोबत विशेष चर्चासत्राचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून आयोजन

Posted On: 26 MAY 2019 4:08PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 मे 2019

 

चित्रपट क्षेत्रात परदेशी निर्मिती क्षेत्राशी सहकार्य वाढावे या हेतुने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्टस्‌ ॲण्ड सायन्स संस्थेचे अध्यक्ष जॉन बेली यांच्या सोबत विशेष चर्चासत्र आयोजित केले आहे. येत्या 28 मे रोजी नवी दिल्लीतल्या सिरी फोर्ट येथे हे चर्चासत्र होणार आहे. यावेळी ऑस्करविषयी चर्चा होईलच त्याशिवाय चित्रपटाचे आधुनिक तंत्रज्ञान आणि इतर माहितीविषयी भारतातल्या या क्षेत्रातल्या लोकांना ज्ञान मिळेल. माहिती प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांच्याशी बेली यांची चर्चा होणार आहे. यावेळी गेल्या काही काळात भारतात चित्रपट निर्मिती सोपी व्हावी यासाठी सरकारने नियमात केलेल्या सुधारणांची माहिती खरे बेली यांना देतील.

या चर्चासत्रातून जगभरात सुरु असलेल्या चित्रपट महोत्सवांची माहिती भारतातल्या चित्रपट निर्मात्यांना मिळेल. 2019 मध्ये इफ्फी चित्रपट महोत्सवाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असणार आहे. याचे औचित्य साधत  ॲकॅडमी ऑफ मोशन पिक्चर्स, आर्टस्‌ ॲण्ड सायन्स संस्थेसोबत सहकार्याने महोत्सव साजरा करण्याचा मंत्रालयाचा प्रयत्न असेल.

N.Sapre/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 (Release ID: 1572677) Visitor Counter : 24


Read this release in: English