वित्त आयोग

वित्त आयोगाची वित्त मंत्रालयासोबत बैठक

प्रविष्टि तिथि: 16 MAY 2019 1:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 मे 2019

 

वित्त आयोगाने काल वित्त मंत्रालयातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत गेल्या पाच वर्षातल्या आर्थिक विकासाचे विस्तृत परीक्षण केले गेले. विकास, गुंतवणूक, औद्योगिक उत्पादन, बँकिंग, चलनफुगवट्याचा दर आणि वित्तीय धोरण या संदर्भात विशेषत्वाने चर्चा करण्यात आली. यावेळी मंत्रालयाने 2018-19 आणि 2019-20 या वर्षांसाठीच्या अंदाजांचे सादरीकरण केले.

जागतिक स्थितीच्या पार्श्वभूमीवर विकासदरात काहीसे चढउतार दिसून आल्याचे आयोगाने नमूद केले. प्रत्यक्ष करसंकलनाची आकडेवारी चांगली राहिली तर अप्रत्यक्ष करसंकलनात काहीसे चढउतार दिसून आले. ‘उदय’ आणि सातव्या वित्त आयोगाच्या परिणामांबाबत विशेषत: राज्यांच्या आर्थिक स्थितीचा संदर्भ लक्षात घेऊन चर्चा करण्यात आली. 15 व्या वित्त आयोगाच्या कालावधीतील वर्षांचा म्हणजे 2020-21 ते 2024-25 यासाठीच्या अंदाजांचा आढावा घेण्यात आला.

वित्तीय व्यवस्थापनाविषयी समग्र चर्चा यावेळी झाली. वस्तू आणि सेवा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांना अनुदान आणि लोकसंख्या आकडेवारी यावरही चर्चा झाली.

आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य अजय नारायण झा, डॉ. अनुप सिंग यांच्यासह वित्त सचिव सुभाषचंद्र गर्ग, मुख्‍य आर्थिक सल्लागार डॉ. कृष्णमूर्ती आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

M.Chopade/S.Kakade/P.Malandkar


(रिलीज़ आईडी: 1572090) आगंतुक पटल : 129
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English