सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
सातव्या आर्थिक जनगणनेसाठी प्रमुख प्रशिक्षकांकरिता राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळा
Posted On:
14 MAY 2019 5:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मे 2019
आगामी सातव्या आर्थिक जनगणनेच्या पार्श्वभूमीवर सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या वतीने नवी दिल्लीत आज राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सातव्या आर्थिक जनगणनेत सहभागी होणारे गणक आणि पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण देण हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. या कार्यशाळेत सहभागी झालेल्यांना जनगणनेची प्रक्रिया, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि गणनेच्या वेळी वापरायचा अनुप्रयोग याचे प्रशिक्षण देण्यात आले. केंद्र सरकारचे अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सातवी आर्थिक जनगणना 2019 च्या अंतर्गत देशातील सर्व आस्थापनातील विविध कार्यप्रणालीबद्दल माहिती एकत्रित करण्यात येणार आहे. जून 2019 पासून सातव्या आर्थिक जनगणनेचे प्रत्यक्ष कार्य सुरु होईल. आत्तापर्यंत सहा आर्थिक जनगणना घेण्यात आल्या असून पहिली आर्थिक जनगणना 1977 मध्ये घेण्यात आली.
N.Sapre/J.Patankar/P.Malandkar
(Release ID: 1571997)
अभ्यागत कक्ष : 174