संरक्षण मंत्रालय
डीआरडीओने केली ‘अभ्यास’ ची यशस्वी चाचणी
प्रविष्टि तिथि:
13 MAY 2019 8:19PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मे 2019
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआडीओने आज ओदिशातल्या चंडीपूर इथल्या एकीकृत परिक्षण केंद्रावरुन ‘अभ्यास’ या हायस्पीड एक्स्पांडेबल एरिअल टार्गेट (हिट) ची यशस्वी चाचणी केली. या चाचणीच्या वेळी ‘अभ्यास’मधील विविध रडार्स तसेच इलेक्ट्रो ऑप्टिक प्रणालीवर लक्ष ठेवण्यात आले. आणि ‘अभ्यास’ ने स्वत:च दिशा निश्चित करुन आपली चाचणी यशस्वी केली.
‘अभ्यास’ एका छोट्या गॅस टर्बाईनवर काम करत असून, यामध्ये स्वदेशी बनावटीच्या दिशादर्शक प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. हे अत्याधुनिक विमान देशाची सुरक्षा अधिक मजबूत करेल.
N.Sapre/J.Patankar/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1571969)
आगंतुक पटल : 202
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English