केंद्रीय लोकसेवा आयोग
राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा 2018 चा निकाल जाहीर
Posted On:
09 MAY 2019 5:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 मे 2019
केंद्रीय लोकसभा आयोगाने 9 सप्टेंबर 2018 रोजी घेतलेल्या लेखी परीक्षा आणि त्यानंतर सर्व्हीस सिलेक्शन बोर्डाने घेतलेल्या मुलाखतीनंतर पात्र ठरलेल्या 520 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 142 व्या तर नौदल अकादमीच्या 104 व्या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात आली. 2 जुलै 2019 पासून अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. या अभ्यासक्रमाच्या तारखेसंदर्भात अधिक माहिती संरक्षण मंत्रालयाच्या www.joinindianarmy.nic.in, www.nausena-bharti.nic.in आणि www.careerairforce.nic.in या संकेतस्थळावर मिळू शकेल.
ही यादी तयार करण्यासाठी उमेदवारांच्या वैद्यकीय चाचणीचे निकाल लक्षात घेण्यात आलेले नाहीत.
केंद्रीय लोकसभा आयोगाच्या http:// www.upsc.gov.in या संकेतस्थळावरही निकाल उपलब्ध आहे. अंतिम निकालाच्या 15 दिवसानंतर उमेदवारांना गुणपत्रिका मिळतील.
N.Sapre/N.Chitale/P.Kor
(Release ID: 1571799)