संरक्षण मंत्रालय

जपान, फिलीपीन्स आणि अमेरिकेच्या नौदल जहाजांसमवेत भारताच्या कोलकाता आणि शक्ती या जहाजांची एकत्रित सागरी सफर

Posted On: 09 MAY 2019 5:10PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 9 मे 2019

 

जपान, फिलीपीन्स आणि अमेरिकेच्या नौदल जहाजांसमवेत भारताच्या कोलकाता आणि शक्ती या जहाजांनी दक्षिण चीनी समुद्रात एकत्रित गट जल सफर केली. 3 मे ते 9 मे पर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात चार देशांमधल्या सहा लढाऊ नौका सहभागी झाल्या. भारताची आयएनएस कोलकाता या विनाशिकेसह आयएनएस शक्ती, जपानची हेलिकॉप्टरवाहू जेएमएसडीएफ इझुमो, जेएनएसडीएफ मुरासामे ही विनाशिका यांच्यासमवेत फिलीपीन्स आणि अमेरिकेची विनाशिका आणि लढाऊ नौकांचा यात समावेश होता. सहभागी राष्ट्रांची भागीदारी अधिकारी दृढ करणे आणि सहभागी राष्ट्रांच्या नौदलात परस्पर सामंजस्य वृद्धींगत करणे हा यामागचा उद्देश आहे.

सहा दिवसांच्या या सागरी प्रवासात या नौकांनी विविध प्रात्यक्षिकंही सादर केली.

 

N.Sapre/N.Chitale/P.Kor


(Release ID: 1571794) Visitor Counter : 157


Read this release in: English