संरक्षण मंत्रालय

मदत आणि बचावकार्यासाठी भारतीय नौदलाची जहाजं सेवेत

Posted On: 02 MAY 2019 9:48PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 2 मे 2019

 

महाप्रलयंकारी चक्रीवादळ ‘फोनी’ 2 मे रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता ओदिशातल्या पुरीपासून 300 कि.मी. आणि विशाखापट्टणमपासून 150 कि.मी. अंतरावर केंद्रीत होते. हे चक्रीवादळ उत्तर दिशेकडे सरकत असून उद्या 3 मे रोजी ओदिशा किनारपट्टीवर गोपालपूर आणि चंदबलीदरम्यान किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. यावेळी ताशी 170 ते 180 कि.मी. वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

भारतीय नौदलाची सह्याद्री, रणवीर आणि कडमत ही जहाजं मदत सामुग्री घेऊन जाणारी जहाजं तैनात करण्यात आली आहेत. तसेच अतिरिक्त मदत सामुग्री,  वैद्यकीय पथकं तसेच पाणबुडे पथक विशाखापट्टणमकडे रवाना करण्यात आले आहे. चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकल्यानंतर झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विमान सज्ज ठेवण्यात आले आहे. तसेच मदत कार्यासाठी आणि हवाईमार्गे मदत सामुग्री पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरही सज्ज ठेवण्यात आली आहेत.

 

N.Sapre/J.Patankar/P.Kor



(Release ID: 1571548) Visitor Counter : 80


Read this release in: English